जिल्ह्यातील 15 हजार 923 कुटुंबांना जीवनावश्यक किट वाटप – स्मिता कुलकर्णी
कोल्हापूर (प्रतिनिधी) आजअखेर १७ हजार १५७ प्राप्त किट पैकी जिल्ह्यातील १५ हजार ९२३ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आल्याची माहिती रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी दिली
विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार कुटुंबातील ४ ते ५ लोकांना १५ दिवस पुरेल अशा पध्दतीने प्रमुख १० जीवनावश्यक वस्तुंचा समावेश या किटमध्ये आहे. पिवळ्या अथवा केसरी अशा कोणत्याच शिधापत्रिकांच्या योजनेत न येणाऱ्या विशेषत: कामगार, मजूर वर्गातील कुटुंबांना याचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून ही मदत प्राप्त होत आहे. आजअखेर १७ हजार १५७ किट प्राप्त झाले आहेत.
करवीर-७९२, गगनबावडा-६ पन्हाळा-३८९, शाहूवाडी-९६,कागल-१२०,राधानगरी-४०३, भुदरगड-५४, आजरा-८०४,गडहिंग्लज-१०८,चंदगड-१३६,शिरोळ-७८१, हातकणंगले-९३१,इचलकरंजी नगरपालिका-३२३५, जयसिंगपूर नगरपालिका-३५, कागल नगरपालिका-३०, मुरगूड नगरपालिका-३७, वडगाव नगरपरिषद-३३९६, कुरुंदवाड नगरपालिका-८१,गडहिंग्लजनगरपालिका- ५६, मलकापूर नगरपालिका-७९६, पन्हाळा नगरपालिका-७६, हुपरी नगरपरिषद-४६३, शिरोल नगरपरिषद-३६०, आजरा नगरपंचायत-६५, चंदगड नगरपंचायत-२२५, हातकणंगले नगरपंचायत-१००५, कोल्हापुरातील गांधी मैदान -३५२, शिवाजी मार्केट -७६, बागल मार्केट-४२९, ताराराणी मार्केट – ६२७ जिल्ह्यातील तालुक्यात, नगरपालिका आणि कोल्हापूर महापालिका अशा ३० केंद्रातील १५ हजार ९२३ कुटुंबांना या जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे, असेही श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या.
57