महाराष्ट्र

प्रा. डॉ. एन.डी.पाटील प्रतिष्ठानकडून 60 हजार रुपयांच्या मास्कसह 2 लाखांची मदत

by संपादक

प्रा. डॉ. एन.डी.पाटील प्रतिष्ठानकडून 60 हजार रुपयांच्या मास्कसह 2 लाखांची मदत
जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे कोरोना नियंत्रणासाठी 60 हजार रुपयांचे मास्क आणि दोन लाख रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी देण्यात आली.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी दोन लाख रुपये मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी दिली. या मदतीचा धनादेश ज्येष्ठ नेते प्रा. डॉ एन डी पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. टी एस पाटील, सचिव एम बी शेख, एम के बाड, विक्रांत पाटील आणि सरोज पाटील यांच्या उपस्थितीत दिला. प्रतिष्ठानतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना साठ हजार रुपयांचे मास्क देण्यात आले.
याप्रसंगी डॉ. एन डी पाटील म्हणाले, कोरोना या जागतिक महामारीने जगभर प्रभाव केलाय. देशात राज्यात आणि जिल्ह्यात या कोरोनाचा संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे जिल्ह्यात प्रभावीपणे काम करत आहेत. त्यामुळे या कोरोनाच्या फैलाव मोठ्या प्रमाणात झाला नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिशय जबाबदारीने या कोरोनाचा सामना करत आहेत. या सर्व प्रशासकीय यंत्रणेला जिल्ह्यातील जनतेने शांततेने, संयमाने आणि गर्दी टाळून घरी राहून सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा. डॉ. एन.डी टील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना संपर्क करत त्यांचे आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कामगिरी बद्दल कौतुक केले. कोरोनाची ही महामारी लगेच थांबणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाल.
या कोरोना नियंत्रणासाठीच्या मदतीमध्ये प्रा. डॉ एन डी पाटील, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. टी एस पाटील, सचिव एम बी शेख यांनी प्रत्येकी पन्नास हजार आणि एम के बाड, विक्रांत पाटील यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत दिली आहे.

You may also like

Leave a Comment