Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार
नवी दिल्ली (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे.
आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विविध श्रेणींमध्ये एकूण पाच व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या केंद्राचा समावेश आहे.
आयुष मंत्रालयांतर्गत आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी आणि होमिओपॅथी या आरोग्य उपचार पद्धतींचा समावेश होतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून समस्यांचे निराकरण करून जोखीम कमी करून योग्य नियोजन करणाऱ्या संस्थांना पुरस्कार जाहीर झाले असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
सोबतच छाननी समितीच्या पुढे झालेल्या सादरीकरणानंतरच पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आल्याची माहितीही श्री. नाईक यांनी दिली. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करून उत्पादनांची तसेच प्रकल्पांची गुणवत्ता, कार्यक्षमता, प्रक्रिया, वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या संस्थांना तसेच व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला.
कैवल्यधाम हे केंद्र पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे असून १७० एकरमध्ये हे केंद्र पसरलेले आहे. या केंद्राची स्थापना १९२४ मध्ये स्वामी कैवल्यानंद यांनी केली. येथे आठव्या शतकातील पतंजली अष्टांग योगचे प्रशिक्षण दिले जाते. यासह येथे आयुर्वेद, नॅचरोपॅथी उपचार पद्धती आहेत.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.