बोरपाडळे (प्रतिनिधी) श्री क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे श्री.सद्गुरु चिले महाराजांचा भंडारा महोउत्सव कोरोना पार्श्वभूमीवर वाढीव लॉकडाऊमूळे अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. पं.पु.श्री.सदगुरु चिले महाराज कासवाकृती समाधी मंदिर श्री.क्षेत्र पैजारवाडी येथे सदगुरु चिले महाराज यांची ३५ वी पुण्यतिथी निमित्त २०२० चा भंडारा महोत्सव दि.१५ ते दि.२२ एप्रिल या सप्ताह कालावधीत आयोजित केला होता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यत वाढवल्याने हा भंडारा महोत्सव मंदिर प्रशासना कडून रद्द करण्यात आला. या भंडारा महोत्सव सप्ताह कलावधीत जमाव व संचारबंदी कायदा नियमानुसार सकाळी श्री.ना अभिषेक,त्रिकाल आरती नैवद्य व इतर धार्मिक कार्यक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीने पार पाडण्यात आले. सलाबाद प्रमाणे या महोत्सवात श्रीचा भव्य मिरवणूकीसह ग्रामप्रदक्षणा पालखी सोहळा न होता औपचारीक रित्या श्रीपादुकांसह मंदिरप्रदक्षिणा संपन्न झाल्या
मंदिर प्रशासनाच्या आवाहन नुसार चिले भक्तांनी संचार व जमावबंदीचे उल्लंघन न करता मोठ्या श्रद्धेने घरीच श्रीचे पूजन करून ऑनलाईन व सोशल मिडियाच्या माध्यमातून श्री दर्शनाचा लाभ घेतला व मंदिर प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल संस्थांनकडून भाविकांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
51