यशवंत इंटरनॅशनल स्कूल ने राबविली ऑनलाइन शिक्षण प्रणाली
– कोडोली (प्रतिनिधी) कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी देशासह सर्व राज्यात शाळा महाविद्यालये बंद आहेत परंतु अशावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता कोडोली ता. (पन्हाळा )येथील यशवंत इंटरनॅशनल स्कूल विशेष प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा व त्यांच्या अभ्यासक्रमाचा विचार करता शहरी शाळा प्रमाणेच ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू केली असल्याची माहिती प्राचार्या सौ. माधवी के .यांनी दिली .
ऑनलाइन शिक्षणातून अद्यावत अध्यापन , मूल्यमापन, शैक्षणिक साधने व निर्मिती, पुढील वर्षाचे नियोजन ,विविध प्रकल्प व त्यांची पूर्तता याकरिता प्राचार्या सौ. माधवी के. व त्यांच्या शिक्षक टीमने अतिशय शिस्तबद्ध रीतीने मांडणी आणि नियोजन केले. सर्व शिक्षकांना याबद्दल माहिती देऊन ऑनलाइन शिक्षण कशा प्रकारे द्यावे याकरिता तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले .या शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना दररोज विविध उपक्रम दिले जात होते. विद्यार्थी हे उपक्रम पालकांच्या मदतीने पूर्ण करून आपले फोटोज स्कूलमध्ये पाठवत असत यातून विद्यार्थ्यांमधील विविध कला गुण व संस्कार जोपासण्याच्या कार्याचे समाधान सर्वच शिक्षकांना मिळत आहे.
पहिली ते पाचवी या वर्गासाठी ही ऑनलाइन प्रणाली संकल्पना १ मे २०२० पासून राबवली जाणार असून सहावी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ,स्काईप, गुगल च्या द्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. या प्रणालीद्वारे एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांना उद्या काय शिकणार आहोत याची माहिती, लेक्चर ची लिंक व वेळापत्रक त्या-त्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले जाते. तसेच लेक्चर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर शंकांचे निरसन फोन कॉल, व्हाट्सअप किंवा ऑनलाइन द्वारे केले जाते .याबरोबरच शिक्षक विविध विषयावरील व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवत आहेत जेणेकरून विद्यार्थी ते वेळोवेळी पाहू शकतील.
या उपक्रमास विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचे सहकार्य लाभत असून याकरिता सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. जयंत पाटील व व्हा. चेअरमन सौ. विनिता पाटील यांनी प्राचार्या सौ.माधवी के., सर्व विभागाचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
कोडोलीतील यशवंत इंटरनॅशनल स्कूलने राबविली ऑनलाइन शिक्षण प्रणाली
110