महाराष्ट्र

असा होता आठवडा…

by संपादक

असा होता आठवडा…
*दि.१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा. कोरोना अपडेट्स*
*दि.१९ एप्रिल २०२०*
– मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे जनतेशी थेट संवाद. प्रमुख मुद्दे – सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा, त्यांना आवश्यक कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाणार, एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी नाही. नागरिकांसाठी लॉकडाऊन संपलेला नाही. ३ मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी रहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. अत्याचारग्रस्त महिलांनी १०० नंबरवर फोन करावा, समूपदेशनासाठी दोन सेवा कार्यरत,मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हेल्पलाइनचा नंबर – १८०० १२० ८२, प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लता यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सुरु, त्याचा नंबर १८०० १०२ ४०४०, खाजगी डॉक्टर्सची सेवा नॉन कोविड रुग्णांसाठीच राहणार,राज्यात ६७ हजार चाचण्या पूर्ण, ९५ टक्के केसेस निगेटिव्ह, ३६०० रुग्ण पॉझेटिव्ह, ३०० ते ३५० रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सुखरूप परत, पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याची स्थिती, ५२ रुग्ण मध्यम ते अतिगंभीर नाहीत अशा स्थितीत, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगार, मजुरांनी आहे तिथेच राहण्याचे आवाहन. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्य. अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड – 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक केल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची घोषणा. गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या मार्फत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना तसेच कायदा-सुव्यवस्था बाबत आढावा बैठक, बैठकीस फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे उपस्थित, महत्वाचे मुद्दे – रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना फळे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळे खरेदी करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, रेशन दुकानात सुलभतेने सुरळीत धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, गावांमध्ये दवंडीद्वारे रेशन नियतनाबाबत माहिती द्यावी, रेशनकार्डधारक नसलेल्या लोकांना धान्य देण्यासाठी उद्योग समूहांच्या सीएसआर निधीतून सहाय्य उपलब्ध करून घेण्याविषयी प्रयत्न करावा. कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ व नागरिकांना भाजीपाला, धान्य, फळे मिळावी यासाठी कृषिविभागाचे नियोजन, शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाइन विक्रीची व्यवस्था, २९८६ शेतकरी उत्पादक गट, आत्मा गट यांच्या माध्यमातून दररोज २० हजार क्विंटल शेतमालाची ऑनलाइन आणि थेट विक्री. ३४ जिल्ह्यांमध्ये २८३० थेट विक्रीची ठिकाणे निश्चित. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, त्यांच्याशी संवाद साधून मनोबल वाढवता यावे यासाठी १८०० १०२ ४०४० हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत साधणार संवाद,महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ३० मानसोपचार तज्ञ समूपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत मार्गदर्शन करणार. ग्रामीण भागात समूपदेशनाची सेवा देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी volunteer@projectmumbai.org या मेलवर संपर्क साधावा. कारखाने अधिनियम, दुकाने व आस्थापना आणि इतर विविध कामगार अधिनियम एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्तीच्या प्रशासकीय मान्यतेस मुदतवाढ देण्यात आल्याची, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. लॉकडाऊन लागू झाल्यापासून राज्यात ३६,९३५ वाहने जप्त, एकूण रु. २ कोटी ६ लाख दंड आकारण्यात आल्याची गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची माहिती. कोविड – १९ प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार असल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. जळगाव, नगर, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, अमरावती, अकोला, लातूर व सोलापूर या २७ जिल्ह्यांमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती.
– दि.२० एप्रिल, २०२०
-पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये, सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची माहिती. ग्रामविकास विभागांतर्गत विविध पदांच्या पदभरतीसाठी www/ egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचे आढळून आल्याने, ही जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही. लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ५७,५१७ गुन्हे दाखल, १२,१२३ व्यक्तींना अटक , ४०,४१४ वाहने जप्त. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत २४२ गुन्हे दाखल. पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची मदत
*- दि.21 एप्रिल 2020*
– लॉकडाऊनच्या काळात चाईल्ड पॉर्न बघण्याच्या प्रमाणात भारतात वाढ, सायबर विभागामार्फत कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इषारा, नवी दिल्ली, मुंबई, कोलकता, इंदौर व इतर १०० भारतीय शहरांमधील ट्रेंड मॅप करणाऱ्या “बाल लैंगिक अत्याचार सामग्री” या अहवालात लॉकडाऊन पूर्वीच्या तुलनेत भारतात पोर्नहबवरील वाहतुकीत ९५{ba665d000b382bcabd60671605af477c7dbe83d8fc1b3f34ff8e83417ee8ebf3} वाढ झाल्याची नोंद, चाईल्ड पॉर्न विरुद्ध जानेवारीच्या मध्यापासून ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ द्वारे चाईल्ड पॉर्न विरुद्ध लढणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य ठरले. या संदर्भात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत १३३ गुन्हे दाखल,४६ जणांना अटक, संपर्क- cybercrime.gov.in महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतिने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत दिल्याची,महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती. बचत गटांमार्फत१० लाखाहून अधिक मास्कची निर्मिती, ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री, ६० हजार लाभार्थ्यांना शिवभोजन, मजूर, ऊसतोड कामगार, माथाडी कामगार आदींसाठी जेवणाची सोय, माफक दरात साडेबारा हजार टनाहून अधिक भाजीपाल्याची माफक दरात विक्री. बेजबाबदार वागू नका, स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका, कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवण्याचे उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे आवाहन. लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत ६० हजार गुन्हे दाखल, १३ हजार व्यक्तींना अटक, ४१ हजार ७६८ वाहने जप्त,अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल, व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद. विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा दंड. केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बैठक. प्रमुख मुद्दे – सहा लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था, ३० एप्रिल नंतर १५ मेपर्यंत विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर परराज्यातील अडकलेल्या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का, याचा विचार केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाइडलाइन निर्गमित करावी, अशी मागणी प्रधानमंत्री तसेच रेल्वेमंत्रालयाकडे केली असल्याचा श्री ठाकरे यांचा पुनरुच्चार. परराज्यातील नागरिक घरी जातांना सुरुवातीपासून शेवटापर्यंत (एंड टु एंड) म्हणजे घरापर्यंत त्यांचे निरीक्षण करा, तिथे क्वारंटाईन करा, विषाणुचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेता येईल अशी व्यवस्था करून त्यांना पाठवता येईल का याचा विचार करून केंद्रशासनाने निर्णय घ्यावा, डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेतेसाठी पीपीई किटस, व्हेंटिलेटर्स आणि इतर मागण्यांची पूर्तता केंद्रशासनाकडून लवकरात लवकर केली जावी, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांच्यासाठी धान्य आणि अन्न यासंदर्भातील केंद्राचे नियम शिथील करा, रेशनकार्ड नसलेल्यांना शिजवलेले अन्न देण्यापेक्षा अन्नधान्य द्या, त्याच्या वितरणाची जबाबदारी राज्य शासन घेईल, असे झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या यंत्रणेवर कमीत कमी जबाबदारी येईल, मुंबई आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती पहाता या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथीलता रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. केंद्रीय पथकाकडून वरळी कोळीवाड्याच्या कोरानामुक्तीचे कौतुक, महाराष्ट्रातील प्रादुर्भावाच्या दुप्पटीचा कालावधी वाढल्याचे स्पष्ट. लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती करण्यात आली, मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ही दुरस्ती लागू , १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील. ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलता रद्द, अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल, फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने मुंबई – पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंद राहतील, मुंबई आणि पुण्यात बांधकामे बंद राहतील, या भागातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करून घ्यायचे आहे, राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतूनाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कँटोन्‍मेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,’ सामाजिक दायित्व निधीमधून, सीएसआर’ निधी जमा करता येणार, उद्योजक, व्यावसायिकांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. प्लास्टिक मोल्डिंग मशिन, साचे, सॅनिटायझर, कफसिरप, वॉटर ॲण्ड बेबी फिडिंग बॉटल्स, इतर बॉटल्सची निर्मिती करणाऱ्या एएसबी इंटरनॅशनल प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपयांची मदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागामार्फत २५१ गुन्हे दाखल. कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार असल्याची, आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत, मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक, योजनेबाबत केंद्र शासनाने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, योजनेंतर्गत लाभ देण्याचे निकष, विमा संरक्षण रक्कम, विमा दर, उंबरठा उत्पादन, जोखीमस्तराची निश्चिती, पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आदीबाबत चर्चा. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम उपस्थित. कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद, यामुळे एकूण रुग्णसंख्या ५२१८ , घरी सोडण्यात आलेले रुग्ण १५०, बरे झालेले रुग्ण ७२२ , उपचार सुरू असलेले रुग्ण ४२४५, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह, ५२१८ जण पॉझिटिव्ह, ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइनमध्ये, ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. नागपूर पोलिसांमार्फत अन्नदान, धान्यवाटप, जीवनावश्यक आदी वस्तूंचे वाटप करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना एकत्र करुन समन्वयकाच्या भूमिकेतून १५ लाख लोकांपर्यंत मदत वाटप सुरु. नोंदणी केलेल्या १३२ संस्थांच्या मदतीची विभागणी, या संस्थांमार्फत दररोज ९५ हजार ते एक लक्ष लोकांपर्यंत शिजविलेल्या अन्नासह विविध साहित्यांचे वाटप.
-दि. २२ एप्रिल २०२०
-कोरोना बाधित ७८९ रुग्ण बरे होऊन घरी, आज ४३१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या ५६४९ झाल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. राज्यातील ९० टक्के ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर, बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोचले, उर्वरित मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोहचणार असल्याची सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा, नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम मशिदीत, रस्त्यावर न येता घरातच करण्याचे आवाहन. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे चिंता व्यक्त, या सर्वांनी कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन. पंडिता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन. राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी -पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८ तर साठीतील रुग्णांची संख्या शंभर असल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती. मुंबई महानगर प्रदेशातील केशरी रेशनकार्डधारकांना गहू व तांदळाच्या वाटपास २४ एप्रिल पासून सुरूवात करणार असल्याची राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची माहिती. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ नागरिकांना मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय, मार्च २०२० चे उर्वरित वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी प्रदान करण्याचे प्रस्तावित. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती. पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी, जातीय रंग देऊ नका, अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नसल्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत २५८ गुन्हे दाखल. कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणुची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा विचार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट. लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत ६३ हजार गुन्हे दाखल, १४ हजार व्यक्तींना अटक तर ४४ हजार वाहने जप्त. स्थलांतरित बेघर कामगार, मजूर, असलेले गरीब व गरजू नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे, त्यांना अन्नधान्य देणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात बचत झालेले 5 टक्के धान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याची परवानगी देण्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचीआपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती. डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नांना यश, एप्रिल २०२० मध्ये पडलेल्या गारपीट व अवेळी पावसाने शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार. महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय खलाशी, कर्मचाऱ्यांचा, मुंबई बंदरावर उतरण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे नियोजन. शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेने या योजनेचा लाभ घेण्याचे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भुमरे यांचे आवाहन.
-दि. २३ एप्रिल २०२०
-मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय पथकांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित. महत्वाचे मुद्दे – मुंबई – पुण्यातला कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या वाढवणे याला प्राधान्य देण्याच्या केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी, सध्या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे ७ दिवसांचा आहे, तो १० दिवसांपेक्षा जास्त करणार, मृत्यू झालेल्यात ७८.९ टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार, मरण पावलेले रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील. केंद्रीय पथकाने रुग्णालयांतील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या व या अनुषंगाने दिलेल्या सूचनांवर मुंबई आणि पुणे येथील प्रशासनार्फत त्वरित कार्यवाही. पीपीई किट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागणार असल्याने अशा किट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात, स्थानिकरीत्या काही कंपन्या अशा किट्स उत्पादित करीत असल्याने केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करावे. पथकाच्या सूचना – संस्थात्मक क्वारंटाईन वाढवा, अधिक फोकस्ड चाचण्या करा, झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची अधिक काळजी घ्या, असे प्रसाधनगृह वापरणाऱ्या धारावीसारख्या भागांमध्ये त्याच परिसरात क्वारंटाईन न करता परिसराबाहेर क्वारंटाईन करा, कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करा, लवकरात लवकर खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स सुरु करा. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची भाषणे समाज माध्यमातून कोट्यवधींपर्यंत नागरीकांपर्यंत पोहचली, टिक-टॉकवर गाठला १ कोटी ७७ लाखांचा टप्पा; अन्य भाषणांना सरासरी पन्नास लाखांहून अधिक जणांचा प्रतिसाद. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र, टाळेबंदीनंतर परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी. ५३ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु, दि. १ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत १ कोटी ५१ लाख १३ हजार ९९९ शिधापत्रिका धारकांना ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी, या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ, या योजनेमधून २० लाख २ हजार ८९१ क्विंटल गहू, १५ लाख ४६ हजार ७७५ क्विंटल तांदूळ, तर १८ हजार ९५० क्विंटल साखरेचे वाटप, स्थलांतरीत मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ८ लाख १८ हजार ३८० शिधापत्रिका धारकांनी ते राहत असलेल्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी दरमहा ५ किलो तांदूळ मोफत, दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी १८ लाख १५ हजार ८१६ रेशनकार्डधारकांना तांदूळ वाटप, या रेशनकार्डवरील ५ कोटी ३८ लाख १हजार ४५४ लोकसंख्येला २६ लाख ९० हजार ७० क्विंटल तांदुळाचे वाटप, या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून देणार. लॉकडॉऊन कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात देणार, यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून स्पष्ट. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर, मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या.
सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर,३५ लाखाहून अधिक लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित आगावू देण्यात येणार. २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत केल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती, कोरोना विषाणू रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी योजना. या सर्वांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.
लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या ३९ रेशन दुकानदारांवर दि. १९ एप्रिल २०२० पर्यंत गुन्हे दाखल, ८७ दुकानांचे निलंबन, ४८ दुकानांचे परवाने रद्द, करण्यात आल्याची अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती. शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ, दररोज दीड लाख शिवभोजन थाळीचे वितरण करणार असल्याची,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. लॉकडाऊनच्या काळात दि.२ मे पर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरु राहणार. लॉकडाऊन सुरू असताना पाणी टंचाईच्या निवारणासाठी टँकर्स मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांची माहिती.
टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांचे निर्देश. लॉकडाऊनच्या कालावधित ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा शासनाचा आदेश निर्गमित. या आदेशात पुढील सेवांना सूट – पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, दाल मिल, पंख्यांची दुकाने, वन विभागाची कार्यालये वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील सागरी जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी.
-दि.२४ एप्रिल २०२०
– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांचा, सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा. महत्वाचे मुद्दे – कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय, सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण, सध्या ऑनलाइन अध्यापन सुरू, ऑनलाइन परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय नाही. सर्व विद्यापीठांमध्ये कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करणार, आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे प्रयोगशाळा सुरू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार – लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार, एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती, हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 साठी देवून सहकार्य करण्याचे आवाहन.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेत१ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती. कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून मान्यता मिळाल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक. कापूस खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे श्री पाटील यांचे निर्देश. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर ९४४ निवारागृहांमध्ये राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधांसोबतच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन सुविधा उपलब्ध, आतापर्यंत ४७ हजार स्थलांतरित मजुरांना या सेवेचा लाभ मिळाला, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तिंचेही समूपदेशन करण्यात आल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. ३० समुपदेशक, २८ मनोविकार तज्ज्ञ, ३६ मनोविकार नर्स यांच्याद्वारे समूपदेशन, प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन पथक कार्यरत. मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देऊन गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत कोरोना पार्श्‍वभूमीवर अधिक काळजी आणि नमाज, तरावीह पठण, इफ्तारसारखे धार्मिक कार्यक्रम घरातच करण्याचे श्री देशमुख यांचे आवाहन. राज्यात कोरोनाबाधीत ३९४ नवीन रुग्णांची नोंद, यामुळे एकूण रुग्ण संख्या ६८१७, ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत ९५७ रुग्ण बरे, ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह, ६८१७ जण पॉझिटिव्ह, सध्या १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाइनमध्ये, ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये, १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१.
– दि. २५ एप्रिल २०२०
राज्यातील २७ जिल्ह्यांना स्वच्छाग्रहींच्या हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख देण्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांची विविध राज्यातील ग्रामविकास मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन. महाराष्ट्र सरकारतर्फे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा सहभाग. महत्वाचे मुद्दे – ग्राम रोजगार सेवकांचा प्रत्येकी २५ लक्ष रुपयांचा विमा केंद्र सरकारने काढावा, मागेल त्याला काम याप्रमाणे नवीन मजुरांना तात्काळ जॉबकार्ड वाटप करावे. उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक, लॉकडाऊनच्या काळात कोणती कामे करण्यास प्राधान्य देता येईल याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संवाद. मंत्रीमहोदयांचे निर्देश- रेशनधान्य वितरण सुरळीत करा, प्रत्येकाला धान्य वाटप करा, खासगी दवाखाने सुरू राहण्यासाठी कार्यवाही करा, विकासकामांना गती मिळण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी द्या. आयटीसी कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत बेडसाइड असिस्टंट, नर्सिंग एड, जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी अटेंडंट, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, डायलेसीस असिस्टंट, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, फार्मसी असिस्टंट या आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित कौशल्य निर्मितीचे १० हजार ८१५ तरुणांना प्रशिक्षण, कोरोनाच्या विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता या उमेदवारांच्या सेवा घेण्यासाठी शिफारस.प्रशिक्ष‍ितांपैकी ९८५ उमेदवारांचा नियुक्तीसाठी होकार. राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून २४ एप्रिलपासून १.५६ लक्ष मे टन धान्याचे वितरण सुरू झाल्याची, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. धान्य वाटपातील गैरप्रकारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून आजतागायत ३९ रेशन दुकानांवर गुन्हे दाखल, ८७ रेशन दुकानांचे निलंबन, ४८ दुकानांचे परवाने रद्द. कोवीड -१९ च्या प्रादुर्भावामध्ये लॉकडाऊनमुळे निर्यात व आयातदार आर्थिक अडचणीत आल्याने, त्यांच्याकडून खासगी कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये वसुल केली जाणारी नजरबंदी, भू भाडे व विलंब शुल्क माफ करण्याची, बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्यामार्फत एका पत्राद्वारे केंद्रीय नौकानयन व जहाजबांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. मनसुख मांडवीय यांना विनंती. लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल, १४,९५५ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड. राज्यात कालपर्यंत ४० प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांचा एक लाखापेक्षा अधिक टप्पा गाठला, दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता, देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात. आज १ लाख ८ हजार ९७२ नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. दि. २४ एप्रिल पर्यंत १ लाख २ हजार १८९ नमुने पाठविण्यात आले, त्यापैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने, करोना करता निगेटिव्ह, ६८१७ जण पॉझिटिव्ह आल्याची,आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.

You may also like

Leave a Comment