कोल्हापूर

कोरे अभियांत्रिकी मार्फत बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन सराव सीईटी व जेईई परीक्षा

by संपादक

कोरे अभियांत्रिकी मार्फत बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन सराव सीईटी व जेईई परीक्षा
(कोडोली) भारतामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे भारतातील तसेच महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये व खाजगी शिकवण्या या साथीचा प्रसार रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व शाळा, महाविद्यालय व खाजगी क्लासेस हे आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर देखील प्रयत्न करत आहे.
– महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करत आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाने सामाजिक जाणीव म्हणून बारावीमध्ये शिकत असलेल्या व जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीइटी ही परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन सराव सीईटीचे परीक्षेचे आयोजन केलेले आहे. हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी मोबाईल वरून सराव सीईटी परीक्षा Tkt eduvedh (अँप) किंवा टीकेआईटी मूडल पोर्टल (वेबसाइट)द्वारे सोडवण्याचा आनंद घेत आहेत. महाविद्यालयाने आत्तापर्यंत सहा हजाराहून जास्त विद्यार्थ्यांना दोन ऑनलाईन सराव सीईटी परीक्षा दिल्या आहेत. तसेच महाविद्यालय यापुढे अजून तीन सराव सीईटी व एक जेईई ची सराव परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, तरी या सराव परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळ www. tkietwarana.ac.in यावर उपलब्ध असलेला नाव नोंदणी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावे. रजिस्टरेशन नंतर महाविद्यालय एसएमएस द्वारे विद्यार्थ्यास सराव सीईटीसाठी लागणारे युजर नेम, पासवर्ड व सराव परीक्षेबद्दलच्या सूचना विद्यार्थ्यांना एसएमएस’द्वारे पाठवेल अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील आणेकर यांनी दिली. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ करून घ्यावा व येणाऱ्या मुख्य सीईटी परीक्षामध्ये चांगले गुण संपादीत करावे असे आवाहन केले. अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. अमोल पाटील- ९४२१२६१९९२
_Tkt eduvedh (अँप) थोडेसे: आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येक घरांमध्ये पोहोचलेला आहे आणि जग आपल्या हातांच्या बोटावरती आलेल आहे. विद्यार्थ्याना तर नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती अद्ययावत असते म्हणूनच कोरे अभियांत्रिकीने विद्यार्थ्यांचा कल ओळखून हे ॲप तयार केले आहे. जेणेकरून विद्यार्थ्याना मोबाईल वर अध्ययन करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या प्लेस्टोर वरती जाऊन हे ॲप मोफत डाऊनलोड करून नोंदणी केल्यानंतर त्यांना घरबसल्या मोफत जेईई व सीईटी सराव परीक्षा देता येणार आहेत_.

You may also like

2 comments

Pratik एप्रिल 26, 2020 - 4:28 pm

Best idea for these students…

Reply
Patil Tejas Shivaji मे 4, 2020 - 8:05 pm

Be fast

Reply

Leave a Comment