कोल्हापूर

[आरोग्य] कोरोना व्हायरस आणि नैराश्य- घेऊया आयुर्वेदाची मदत

by संपादक

कोरोना व्हायरस आणि नैराश्य- घेऊया आयुर्वेदाची मदत
चीनच्या हुबई – वुहान शहरातून आलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर आपले थैमान घातले आहे. जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांमध्ये या व्याधीचा फैलाव झालेला आहे.३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोविड १९ चा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण भारतात हा कोरोना व्हायरस पसरला. सध्या महाराष्ट्रामध्ये या रुग्णांची संख्या सहा हजाराच्या आसपास पोहोचलेली आहे.
– खरतर ह्या कोरोना व्हायरसचा परिणाम लॉकडाऊन केल्यामुळे जेवढा जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे अथवा एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याच्या शरीरावर होत आहे त्याहूनही अधिक परिणाम या व्याधीने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या मानसिकतेवर तसेच ज्यांना हा व्याधी झालेल्या नाही त्यांना आपल्यालाही हा व्याधी होईल या भीतीने या लोकांच्या मानसिकतेवर होत आहे.
– आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुष डॉक्टरांना’ गेल्या दोन आठवड्यापूर्वी जे प्रशिक्षण देण्यात आले त्यापैकी एका सत्रांमध्ये कलंक व भेदभाव याचाही समावेश केला आहे. कारण या व्याधीमुळे कलंक व भेदभाव निर्माण होत आहे. त्यामुळे हा कलंक निर्माण होऊ न देणे ही सध्याची गरज आहे त्याबद्दलची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत .
– कलंक म्हणजे नेमके काय?
– तर एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह यांच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टीवर आधारित येणारी नकारात्मकता म्हणजे कलंक.आता ही नकारात्मक कोविड-१९ बद्दल का झाली असावी?
– तर एक तर हा नवीन व्हायरस (विषाणू) आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती व चिंता वाढू लागली आहे.यामध्ये लोकांमध्ये नेमकी भीती का व कशाची आहे ते पाहुया—
– आपण या व्याधीमुळे आजारी पडू अथवा मृत्यूमुखी पडू अशी वाटणारी भीती.
– आरोग्ययंत्रणे पर्यंत पोहोचण्याची केली जाणारी टाळाटाळ कारण तेथे उपचार घेताना आपल्याला नव्याने या व्याधीचे संक्रमण होईल अशी वाटणारी भीती .
– जर व्याधीमुळे आपले अलगीकरण केले गेले तर आपल्याला काम करता येणार नाही व आपल्याला कामावरून काढून टाकतील असे वाटणारी भीती.
– आपल्याला जर व्याधी झाला तर समाजातून पूर्णत: वेगळे करतील किंवा आपले विलगीकरण करतील अशी वाटणारी भीती. – आपल्या जवळच्या व्यक्तीचे विलगीकरण केले गेल्यामुळे आपल्याला स्वतःला जवळच्या व्यक्तीची काळजी न घेता आल्याने निर्बल झाल्याची भावना येणे अथवा स्वतःचे विलगीकरण केले गेल्याने जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती वाटणे.
– अलगीकरण केले गेल्यामुळे असहाय्यता, कंटाळलेपणा , एकाकीपणा व नैराश्य येणे व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती साठी आपण काहीही काम करू न शकत असल्याची भावना येणे.
– ह्या सर्व गोष्टींची भीती वाटून लोकांमध्ये तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे हे थांबणे हे खूप महत्त्वाचे आहे.
– कलंक निर्माण होण्याचे नेमके कारण काय?
– कारण कोविड-१९ हा नवीन व्याधी आहे. – या विषाणू विषयीच्या अजून बऱ्याच गोष्टींचा शोध अद्याप लागलेला नाही. शिवाय या विषाणू विषयी अजूनही बऱ्याच गोष्टींची माहिती देखील नाही. त्यामुळे लोक काळजीत पडले आहेत. – या विषाणू विषयाच्या खोट्या व फसव्या गोष्टीमुळे देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
– आता हा कलंक ओळखायचा कसा याची काही उदाहरणे पाहूया.
– समजा एखाद्या दुकानदाराला खोकला झाला तर तो खोकला काढायला देखील घाबरतो कारण त्याला आपण आपले गिर्‍हाईक गमवू अशी भीती वाटते. – एखादी नोकरीसाठी पुणे/मुंबई येथे गेलेली व्यक्ती आता ह्या लॉकडाऊन मुळे आपल्या घरी आली असेल तर त्याचे घरचे तणावग्रस्त होतात कारण हा त्या व्याधीच्या प्रभावातील भागातून आलेला आहे की जिथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आणि आपल्यालाही त्याच्यामुळे हा व्याधी होऊ शकतो अशी वाटणारी भीती. – ज्या मुलांचे पालकांना विलगीकरण किंवा अलगीकरण केले गेले आहे अशा मुलासोबत आपल्या मुलांना खेळायला पाठविताना पालकांना वाटणारी भीती.
– कलंक दूर करण्यासाठी नेमके काय करावे ?
कोविड-१९झालेल्या रुग्णांना व्याधीग्रस्त असे लेबल न लावता त्यांना आधार देण्याची गरज आहे . – लोकांना सूचित करणे की, हे एक असे संक्रमण आहे की ज्याच्या ८०{ba665d000b382bcabd60671605af477c7dbe83d8fc1b3f34ff8e83417ee8ebf3} केसेस ह्या सामान्य केसेस आहेत.
– लहान मुले व जेष्ठ नागरिक हे हाय रिस्क मध्ये येत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– सतत टी .व्ही.वरील नकारात्मक बातम्या जसे कोरोना बाधित रुग्णांचे वाढलेले आकडे ,मृतांची संख्या पाहणे , खोट्या बातम्या पसरवणे हे टाळावे. त्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. – शिवाय कोविड-१९ मधून बरे झालेले रुग्ण ही भरपूर आहेत हा सकारात्मक विचार करावा. लोकांचा तणाव कमी करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ची मदत घेणे, लोकापर्यंत आशादायक व सकारात्मक गोष्टी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. – स्वतः निवांत राहण्यासाठी अशा कामात मग्न राहणे जसे घरात बैठे खेळ खेळणे, वाचन करणे, बाग काम करणे, घरातील स्वच्छतेची कामे करणे. – समाजामध्ये कोविड-१९ बद्दल जेवढी योग्य माहिती पुरवता येईल तेवढी पुरविणे. – एखाद्या रुग्णाला (संशयित रुग्ण) कोविड-१९ चा रुग्ण असे न म्हणता त्याच्या नावाने बोलवावे . – सत्य -हे कलंक कमी करण्यासाठी सकारात्मक गोष्टी या भीती कमी करण्यासाठी वापराव्यात. – कोविड -१९ रुग्ण वाढत आहेत ही एक नकारात्मक गोष्ट असेल तर त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे अशा सकारात्मक गोष्टी लोकांना सांगाव्यात जेणेकरून त्यांची भीती कमी होईल.
-आता हे नैराश्य घालविण्यासाठी आपण आयुर्वेदाची मदत कशी घेऊ शकतो हे पाहूया…
-नैराश्य ही एक सामान्य मानसिक विकृती आहे जी सर्वावर परिणाम करते .नैराश्याशी संबंधित कलंकावर मात केल्यास अनेक लोकांना मदत मिळू शकेल.
– जागतिक स्तरावर विचार करायचा झाल्यास डब्ल्यू. एच.ओ च्या अंदाजानुसार जगातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एकाच्या आयुष्यावर मानसिक किंवा न्यूरोलॉजिकल विकारांचा काहीवेळा परिणाम झालेला असेल व जवळजवळ ४५० दशलक्ष लोक अशा अवस्थेने ग्रासलेले आहेत. ही २०१५- २०१६ ची माहिती आहे. मग आता तरी कोविड-१९चे संकट संपूर्ण जगभर असताना हा आकडा निश्चितच वाढलेला आहे.
– यासाठीच हे नैराश्य दूर करायचे असेल तर आयुर्वेदात सांगितलेले योगा, प्राणायाम, ध्यान, धारणा करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
– योगा व प्रणायामामुळे
– शरीर व मन यांचे कार्य सामर्थ्य वाढते – मनाची चंचलता दूर होऊन, मनाची एकाग्रता वाढते. – धातुबल वाढते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. – उत्साह वाढतो, अवयवांची कार्यक्षमता वाढते . – अग्निप्रदीप्त होतो (भूक चांगली लागते) – व्याधी नाश होतो. – अध्यात्मिक प्रगती होते. हे फायदे होतात.
– या नैराश्याला दूर करण्यासाठीची काही आसने पाहूया..
– मानसिक तणावनाशक व मन:शांती प्राप्तीसाठी, मकरासन, सर्वांगासन, शवासन – आलस्यनाशनासाठी -वक्रासन ,अर्धमच्छेंद्रासन – आत्मविश्वास वाढीसाठी- उष्ट्रासन, अर्धचक्रासन – मानसिक शांतीसाठी- सुप्तवज्रासन, शशांकासन, पार्श्वकोनासण ही आसने करावीत.
– प्राणायाम —अष्टकुंभकाचे फायदे पाहूया
– सूर्यभेदनी प्राणायाम —यामुळे मानसिक व्याधी दूर होतात . – उज्जायी प्राणायाम— यामुळे शरीर स्वस्थता प्राप्त होते व श्वसनाचे विकार दूर होतात. – सीतकारी प्राणायाम— यामुळे मनाच्या सत्त्वगुणाची वृद्धी होते. – शीतली प्राणायाम — यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे हा उन्हाळ्यात करणे हितवह आहे. – भस्त्रीका प्राणायाम– हा हृदयरोगाच्या रूग्णासाठी उपयुक्त आहे. यामुळे मन:शांती प्राप्त होते. – भ्रामरी प्राणायाम — यामुळे मस्तिष्कगत नाड्यांची शुद्धी होत असलेने मानसिक तणाव, मानसरोग ,चिंता यापासून मुक्ती होते.उच्चरक्तदाबाचे रुग्णांमध्ये उपयुक्त आहे .यामुळे चित्तवृत्तीची स्थिरताही प्राप्त होते. – मूर्च्छा प्राणायाम- यामुळे मनाची चंचलता दूर होते. हा प्राणायाम मानसिक तणाव, उद्वेग शमन करणारा आहे. मनाची एकाग्रता वाढविणारा आहे. – प्लाविनी प्राणायाम — यामुळे पचनशक्ती वाढते, शरीर हलके होते.
-या आयुर्वेदातील योगा व प्राणायामाचा सध्या व नेहमीच आपण वापर केला तर नैराश्य दूर ठेवण्यासाठी मदत होईल .
चला तर मग कोरोना नावाच्या संकटाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जाऊया व या संकटाला लवकरच हरवूया आणि आपला महाराष्ट्र आपला भारत देश पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभा करू या….!
डॉ. सुलेखा शिवराज साळुंखे (आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी – आयुष विभाग, उपजिल्हा रुग्णालय,कोडोली,कोल्हापूर)

You may also like

3 comments

Ravi Vijay kshirsagar एप्रिल 26, 2020 - 5:57 pm

Very Good

Reply
Sagar Patil एप्रिल 26, 2020 - 8:21 pm

Ayurveda has great potential in restoring the good health…

Reply
UTTAM Kataware एप्रिल 26, 2020 - 10:43 pm

Khup chan mahiti aahe
Covid 19 chi bhiti aaj khup jast pramanat passes aahe Hatvar velich upay yojana Karne garjeche aahe

Reply

Leave a Comment