माले येथील शेतात विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू – वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा मूळे आज दोन निष्पाप जीवांचा बळी गेला
– कोडोली(प्रतिनिधी) माले ता. पन्हाळा येथील मळा नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेलेवर शेतात उभा असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढलेल्या तारेला स्पर्श होऊन लागलेल्या शॉकने बाबासो पांडुरंग पाटील वय ४८ रा. महादेवनगर माले यांचा व त्यांना वाचवावयास गेलेला मुलगा कु. राजवर्धन वय १६ याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली.आज अक्षयतृतियाच्या सनादिवसीच सकाळीच बापलेकांचा झालेला मृत्यू ह्रदय पिळवटणारा ठरला या घटनेने मालेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
– पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील बाबासो पांडुरंग पाटील हे माले इथं घरजावई म्हणून रहात होते ते आज सकाळी शेतावर जनावरांना चारा आणण्यासाठी दोन मुलगे आणि सासरे यांच्या सोबत गेले होते.माले येथील मळा नावाच्या शेतातून ११ किं.वॅटची विद्युत वाहिनी गेली आहे या शेतात असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे याच तारेला बाबासाहेब यांचा स्पर्श झाला त्यातच ते गतप्राण झाले तर त्यांंना वाचवण्यास गेलेला त्याचा मुलगा राजवर्धन याचेही विजेच्या धक्याने निधन झाले.दरम्यान त्यांचा लहान मुलगा लदेखील त्याच दिशेने जात असताना त्यांच्या सासऱ्यानी त्याला मागे ओढले त्यामुळेे तो वाचला.बाबासो पाटील आणि राजवर्धन यांचं शव विच्छेदन कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात केले असून मृत देहांवर त्यांच्या उत्रे या मूळ गावी अंत्यसंस्कार झाले.
[ वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा मूळे आज दोन निष्पाप जीवांचा बळी गेला , वीज वितरण कंपनी काही आर्थिक मदत करेल पण त्या दोन जीवांची पोकळी कोण भरून काढणार , बाबासो यांचं वय अवघे ४८ आहे तर त्यांच्या मुलगा राजवर्धन याने नुकतीच १०वी ची परीक्षा दिली आहे त्यांचा काय दोष , वीज वितरण कंपनी कंत्राटदार नेमून काम करून घेते , टेबल खालची देव – घेव होऊन कंत्राट दिली जातात , निकृष्ठ दर्जाची कामे केली जातात त्यांचं प्रामाणिक ऑडिट होत नाही , एकदा उभारलेले खांब किंवा विद्युत वाहक तारा या तुटून खाली पडत नाहीत तो पर्यंत त्यांची क्षमता तपासली जात नाही किंवा पुढील अनर्थ टाळावा म्हणून काही काम केलं जातं नाही आणि पर्यायाने मग सर्व सामान्य जिवांना त्यांचे प्राण गमवावे लागतात .]
104