कोडोलीतील परप्रांतीय मजूरांना रोटरी ग्रामसेवा केंद्राची मदत.
कोडोली(प्रतिनिधी) सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे.यामध्ये समाजातील अनेक व्यक्ती आणि संस्था आपआपल्या परीने योगदान देत आहेत.रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरच्या वतीनं प्रामुख्याने गरजू कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे.येथे राहिलेल्या विजापूर मधील सुमारे पंधरा कुटुंबांना ग्रामसेवा केंद्राच्या वतीने मदत देण्यात आली.यावेळी रोटरी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य डॉ.शामप्रसाद पावसे यांनी मोफत औषध वाटपही केले. तांदूळ,साखर,तेल,डाळ,चहा पावडर ,आटा ,साबण, खोबरेल तेल अशा वस्तू गरजू कुटुंबांना देण्यात आल्या.कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे,ग्रामसेवा केंद्राचे मार्गदर्शक युवा उद्योजक विशाल जाधव, अध्यक्ष – प्रवीण पाटील, केंद्राचे सदस्य डॉ.अमित सूर्यवंशी,प्रकाश सूर्यवंशी, सुनील पोवार यांच्या हस्ते आणि ग्रामसेवा केंद्राच्या सदस्यांच्या उपस्थितीत मदतीचं वाटप करण्यात आलं.यावेळी डॉ.शामप्रसाद पावसे यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन करत मजूरांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत होमिओपॅथीक औषधांचं वाटप केलं.या उपक्रमासाठी रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे सदस्य डॉ. अमित सूर्यवंशी,प्रवीण बावणे,प्रकाश सूर्यवंशी,सुनील पोवार यांनी विशेष सहकार्य केलं.सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी या मदती बद्दल कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने रोटरी ग्रामसेवा केंद्राचे आभार अध्यक्ष प्रवीण पाटील आणि सचिव विशाल बुगले यांच्याकडे आभार पत्र सुपुर्द केले.मदत वाटपा वेळी रोटरी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य संदीप रोकडे,जयदीप पाटील, डॉ.सतीश पाटील,कृष्णात जमदाडे, कोडोली पोलीस ठाण्याचे शशिकांत पाटील,कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.
106