रिलायन्स इंडस्ट्रीकडून 2 हजार 200 मास्क जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
कोल्हापूर (प्रतिनिधी)रिलायन्स इंडस्ट्रीचे सत्यजीत भोसले यांनी आज थ्री प्लाय मास्क २ हजार आणि वुमन सेल्फ ग्रुपच्यावतीने तयार करण्यात आलेले २०० असे एकूण २ हजार २०० मास्क जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
– हिंडाल्को इंडस्ट्रीजकडून जीवनावश्यक वस्तुंचे ३०० किट सुपूर्द-
– जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेच्यावतीने खाणकाम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मे. हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. या खाणकाम कंपनीने ३०० किट रोहयोच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केले. प्रत्येक किटमध्ये १० जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे.
– यावेळी हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. भूगर्भशास्त्र महा व्यवस्थापक उदय पवार, वित्त व लेखाचे सहायक व्यवस्थापक गणेशन कुमार, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, नायब तहसिलदार सुहास घोरपडे, सीपीआरचे डॉ. संतोष जनवादे, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. प्रविण कांबळे, अव्वल कारकुन बाबुराव खोत, संदीप जाधव, अमित देसाई उपस्थित होते.
83