Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

शेकडो लोकांना तृप्त करणारी.. शिवभोजन थाळी
– जगभरात कोरोना अर्थात कोविड 19 या संसर्गजन्य विषाणूने हाहाकार माजवला आहे. सगळे जग हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसरत करत आहे. सगळे उद्योग, व्यवसाय नाईलाजास्तव बंद करावे लागले. सगळीकडे रस्त्यावरची चाकं थांबली तशी औद्योगिक नगरीतलीही चाके थांबली… हातावर पोट असणाऱ्यांची मात्र अबाळ झाली नाही… त्यांच्यासाठी शिवभोजन योजना खूप लाभदायी ठरत आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून रोज शेकडो लोकं तृप्त होत आहेत. त्यानिमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा आढावा…!!
– कोरोना (कोविड – 19) संसर्गामुळे २३ मार्च पासून महाराष्ट्र लॉक डाऊन झाला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आले. यामध्ये हॉटेल, विविध खाद्य पदार्थ विक्री करणारे गाडे यांचाही समावेश आहे. यामुळे गोरगरीब नागरिक उपाशी राहतील ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यात शिवभोजन योजनेची व्यापकता वाढवली. आजच्या घडीला ही शिवभोजन योजना प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील २६ केंद्रावर अंदाजे १७०९ गरीब व गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत. ही शिवभोजन थाळी प्रती माणशी ५ रुपये या नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
– सातारा शहरात एसटी कॅन्टीन-१००, जिल्हा परिषद कॅन्टीन-१००, बेंद्रे स्नॅक्स-१२५, तहसील कार्यालय, सातारा-१२५ या ठिकाणी शिवभोजन योजना सुरु आहे. या प्रत्येक भोजनालयाला १२५ शिवभोजन थाळी मंजूर आहेत.
– जगदंब हॉटेल, एसटी स्टॅन्ड समोरे वडूज-१२५,कमलनयन हॉटेल, आझाद चौक, कोरेगाव-१५०, श्रीराम भोजनालय वेण्णा चौक, मेढा-१००, किस्मत रेस्टॉरंट, पंचायत समिती समोर, दहिवडी-१२५, सहारा हॉटेल, मस्जीद रोड, माखरीया हायस्कूल समोर, महाबळेश्वर-१००, हॉटेल न्यू त्रिमूर्ती जुना एसटी स्टॅन्ड, पाटण-५०, गुरुप्रसाद एसटी उपहारगृह, एसटी स्टॅन्ड, पाटण-५०, भिसे खानावळ, तहसील कार्यालय जवळ, पाटण-५०, श्रीराम हॉटेल, शिरवळ ता. खंडाळा-१५०, अन्नपूर्णा शेतकरी कॅटींन, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, फलटण-१००, अतिथी हॉटेल, रविवार पेठ, पंचायत समिती शेजारी, फलटण-५०, चंदू भोजनालय, सोनगिरवाडी, वाई-१००, हरिप्रसाद हॉटेल, शाहू चौक, नवीन प्रशासकीय इमारत, कराड-७५, दौलत भोजनालय, कराड शहर पोलीस स्टेशन शेजारी, कराड-५०, परिवर्तन भोजनालय, ढेबवाडी फाटा, कृष्णा हॉस्पीटल परिसर मलकापूर, कराड-५०, मिसळ हाऊस, कृष्णा नाका, वाखाण रोड, कराड-५०, सॉफ्ट स्नॅक्स स्पॉट, मंगळवार पेठ, कराड-५०, समता जनाधार भोजनालय, कॉटेज हॉस्पिटल समोर, कराड-५०, लई भारी स्नॅक सेंटर, एनएच ४ हायवे नाका, मलकापूर, कराड-५०, श्री स्वामी सेवा इव्हेंट अँड केटरर्स, कराड-५०, अमोल शिवाजी बनसोडे केटरर्स-५०, धन स्वयंसहायता महिला गचतगट-५०अशा एकूण जिल्ह्यातील २६ भोजनालयांना १ हजार १५० शिवभोजन थाळी मंजूर आहेत. जिल्ह्यातील या २६ भोजनालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार सोशियल डिस्टन्स पाळून वाटप गरजुंना नाममात्र ५ रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.१ हजार ७०९ गरीब व गरजू लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
– युवराज पाटील- जिल्हा माहिती अधिकारी- सातारा

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.