आघाडीच्या कोविड-19 आरोग्यसेवा योध्यांच्या मदतीसाठी एचसीएआरडी, रोबोट

by Admin

आघाडीच्या कोविड-19 आरोग्यसेवा योध्यांच्या मदतीसाठी एचसीएआरडी, रोबोट
– नवी दिल्ली (प्रतिनिधी)चोवीस तास संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेताना रुग्णालयातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा संसर्ग होण्याचा धोका आहे. कदाचित नवीन मित्र, एचसीएआरडी याच्या मदतीमुळे धोक्याची पातळी कमी होऊ शकेल. हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस अर्थात एचसीएआरडी हे रोबोटिक उपकरण आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपासून शारीरिक अंतर राखण्यास मदत करू शकते.
– दुर्गापूर स्थित सेंट्रल मेकेनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सीएसआयआर प्रयोगशाळेने एचसीएआरडी विकसित केला आहे. हे उपकरण अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि नेव्हिगेशनच्या स्वयंचलित तसेच मानवचलित अशा दोन्ही मोडमध्ये कार्य करते.
– नेव्हिगेशन, रूग्णांना औषधे आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी ड्रॉव्हर अ‍ॅक्टिवेशन, नमुना संकलन आणि दृकश्राव्य संवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह नियंत्रण कक्ष असलेल्या परिचारिका बूथद्वारे या रोबोटचे नियंत्रण आणि परीक्षण केले जाऊ शकते.
– सीएसआयआर-सीएमईआरआयचे संचालक प्राध्यापक (डॉ.) हरीश हिरानी, यांनी सांगितले की, “अनिवार्य शारीरिक अंतर कायम ठेवत कोविड-19 रुग्णांची सेवा करणाऱ्या आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी, हॉस्पिटल केअर असिस्टिव्ह रोबोटिक डिव्हाइस प्रभावी ठरू शकते.” या उपकरणाची किंमत ५ लाखांहून कमी आहे आणि याचे वजन ८० किलोहून कमी असल्याचे प्रा. हिरानी म्हणाले.
– सीएसआयआर-सीएमईआरआय तांत्रिक हस्तक्षेपाच्या माध्यमातून कोविड-19 च्या प्रभाव कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. डब्ल्यूएचओ ने सांगितले आहे की, समाजात कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) खूप महत्वाची आहेत, आणि म्हणूनच लोकांना आणि आरोग्यसेवा संस्थांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी संस्थेने आपल्या स्रोतांचा अधिकाधिक उपयोग पीपीई आणि समुदाय-स्तरीय सुरक्षा उपकरणे विकसित करण्यासाठी केला आहे.
– सीएमईआरआयच्या वैज्ञानिकांनी काही इतर सानुकूलित तंत्रज्ञान देखील विकसित केले आहेत ज्यात निर्जंतुकीकरण पदपथ, रोड सॅनिटायझर युनिट, फेस मास्क, मेकॅनिकल व्हेंटिलेटर आणि हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट सुविधा यांचा समावेश आहे.

You may also like

Leave a Comment