केंद्र सरकारने कोविड-19 महामारीमुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांसह अडकून पडलेल्या अन्य व्यक्तींची आंतरराज्य ने-आण केली सुकर
– नवी दिल्ली (प्रतिनिधी)कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत मजूर, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्ती अडकल्या आहेत.या व्यक्तींची रस्ता मार्गे ने-आण करण्यासाठी केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.एका राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात या व्यक्तींना हलवता येणार आहे मात्र त्यासाठी संबंधित राज्यांनी परस्परांशी चर्चा करून परस्परांची सहमती घेणे आवश्यक आहे.
– नियोजित स्थानी पोहोचल्यानंतर अशा व्यक्तींसंदर्भात स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन करून या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता नाही, असे मूल्य मापनात आढळल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवावे, यावर भर देण्यात आला आहे. वेळो वेळी आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात यावी.
– यासाठी अशा व्यक्तींनी आरोग्य सेतू ऐपचा उपयोग करावा यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्र्देशानी त्यांना प्रोत्साहन द्यावे,याद्वारे या व्यक्तींच्या आरोग्यावर देखरेख ठेवता येईल.
79