कोल्हापूर

मुलाच्या प्रेमापेक्षा वडिलांनी दिले राष्ट्र प्रेमाला महत्त्व

by संपादक

मुलाच्या प्रेमापेक्षा वडिलांनी दिले राष्ट्र प्रेमाला महत्त्व
– कोडोली,( प्रतिनिधी) आपल्या मुलामुळे संपूर्ण गावाला बाधा होऊ नये असा विचार करून आपला मुलगा व त्याचा मित्र पुण्याहून आला असल्याची माहिती खुद्द वडिलांनीच तलाठी कार्यालयातील कोतवाल सिराज आंबी यांना देऊन मुलाच्या प्रेमापेक्षा वडिलांनी राष्ट्रप्रेम प्रेमास महत्त्व दिल्याची चर्चा कोडोली परीसरात होत आहे.
कोडोली व परिसरातील अनेक मुले पुणे येथे नोकरीस आहेत. सध्या देशासह राज्यात कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही पुणे शहरात त्याची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने अनेक जण भीतीने पुणे सोडून गावाकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न कोडोली ता. पन्हाळा येथील तरुणाने व त्याच्या मित्राने केला या दोघा तरुणांनी आपले गाव गाठण्याची जिद्द बाळगून त्यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता पुणे शहरातून पायी चालत प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान चार तासांची झोप घेऊन पुन्हा प्रवास सुरू करत तब्बल २५० किलोमीटर पायी प्रवास करून सहाव्या दिवशी कोल्हापूर-सांगली या जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील चिकुर्डे पूल येथे आल्यानंतर त्यांना पोलिस गस्त घालत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना मी व माझा मित्र पुणे येथून चालत आल्याची माहिती दिली.
वडिलांना व त्याच्या कुटुंबीयांना आपल्या मुलाच्या भेटीची आस होती. पण वडिलांनी आपल्या मुलामुळे संपूर्ण गाव बाधित होईल असा विचार करून मुलाचे प्रेम बाजूला सारत राष्ट्रहितासाठी व गावाच्या आरोग्यासाठी आपला मुलगा पुणे येथून चिकुर्डे पुलावर आला असल्याची माहिती तलाठी कार्यालयातील शिराज आंबी यांना सांगितली.आंबी यांनी ही माहिती क़ोडोली चे सरपंच शंकर पाटील यांना दिली. त्यांनी कोणताही विलंब न करता केखले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका नदाफ यांना घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली व त्यांना ,२८ दिवसांचे क्वांरटाईन करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अलगीकरण कक्षात पाठविले. यावेळी वडिलांना समोर पाहताच मुलाला अश्रू आवरता आले नाहीत.
आज अनेकजण कोणता ना कोणता गैरमार्ग वापरून मुंबई- पुणे येथून आपल्या गावाकडे येत आहेत. घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित लोकही ते आले नसल्याचे बिनधास्तपणे सांगून आपल्यासह सर्वांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. पण वरील मुलाचे वडील शेतकरी असून त्यांनी आपल्या देशाचा, राज्याचा, गावाचा विचार करून मुलाच्या प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेमाला महत्त्व दिले .ह्याच विचाराने प्रत्येक जण वागले तर आपला देश, राज्य लवकरच क़रोना मुक्त होईल.
कोडोली,( प्रतिनिधी) आपल्या मुलामुळे संपूर्ण गावाला बाधा होऊ नये असा विचार करून आपला मुलगा व त्याचा मित्र पुण्याहून आला असल्याची माहिती खुद्द वडिलांनीच तलाठी कार्यालयातील कोतवाल सिराज आंबी यांना देऊन मुलाच्या प्रेमापेक्षा वडिलांनी राष्ट्रप्रेमास महत्त्व दिल्याची चर्चा कोडोली परीसरात होत आहे.
– कोडोली व परिसरातील अनेक मुले पुणे येथे नोकरीस आहेत. सध्या देशासह राज्यात कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातही पुणे शहरात त्याची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने अनेक जण भीतीने पुणे सोडून गावाकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न कोडोली ता. पन्हाळा येथील तरुणाने व त्याच्या मित्राने केला या दोघा तरुणांनी आपले गाव गाठण्याची जिद्द बाळगून त्यांनी बुधवारी पहाटे पाच वाजता पुणे शहरातून पायी चालत प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान चार तासांची झोप घेऊन पुन्हा प्रवास सुरू करत तब्बल २५० किलोमीटर पायी प्रवास करून सहाव्या दिवशी कोल्हापूर-सांगली या जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील चिकुर्डे पूल येथे आल्यानंतर त्यांना पोलिस गस्त घालत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना मी व माझा मित्र पुणे येथून चालत आल्याची माहिती दिली.
-वडिलांना व त्याच्या कुटुंबीयांना आपल्या मुलाच्या भेटीची आस होती. पण वडिलांनी आपल्या मुलामुळे संपूर्ण गाव बाधित होईल असा विचार करून मुलाचे प्रेम बाजूला सारत राष्ट्रहितासाठी व गावाच्या आरोग्यासाठी आपला मुलगा पुणे येथून चिकुर्डे पुलावर आला असल्याची माहिती तलाठी कार्यालयातील शिराज आंबी यांना सांगितली.आंबी यांनी ही माहिती क़ोडोली चे सरपंच शंकर पाटील यांना दिली. त्यांनी कोणताही विलंब न करता केखले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका नदाफ यांना घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली व त्यांना ,२८ दिवसांचे क्वांरटाईन करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अलगीकरण कक्षात पाठविले. यावेळी वडिलांना समोर पाहताच मुलाला अश्रू आवरता आले नाहीत.
– आज अनेकजण कोणता ना कोणता गैरमार्ग वापरून मुंबई- पुणे येथून आपल्या गावाकडे येत आहेत. घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित लोकही ते आले नसल्याचे बिनधास्तपणे सांगून आपल्यासह सर्वांचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. पण वरील मुलाचे वडील शेतकरी असून त्यांनी आपल्या देशाचा, राज्याचा, गावाचा विचार करून मुलाच्या प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेमाला महत्त्व दिले .ह्याच विचाराने प्रत्येक जण वागले तर आपला देश, राज्य लवकरच क़रोना मुक्त होईल.

You may also like

Leave a Comment