Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

‘राज्य उत्पादन शुल्क’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटींची मदत
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द
– मुंबई(प्रतिनिधी) ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 ‘साठी १ कोटींच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.
– ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील २ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी १ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या जमा केलेल्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.
– राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.