वारणा-कोडोली परिसरातील पत्रकारांना डॉ. श्यामप्रसाद पावसे यांचेकडून होमिओपॅथिक औषधे मोफत वाटप
– कोडोली (प्रतिनिधी) कोरोना या विषाणूवर कोणत्याही प्रकारची लस आज तरी उपलब्ध नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय सद्यस्थितीत आपल्याकडे आहे असे प्रतिपादन सिद्धि होमिओपॅथिक हॉस्पिटल कोडोली चे डॉ. श्यामप्रसाद पावसे यांनी केले.
– शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने होमिओपॅथिक व आयुर्वेद औषधाला परवानगी दिली आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मिशन होमिओपॅथी चे संस्थापक आणि पुण्यातील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. अमरसिंह निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली येथील सिद्धि होमिओपॅथिक हॉस्पिटलचे डॉ. श्यामप्रसाद पावसे यांचेकडून वारणा-कोडोली परिसरातील पत्रकारांना कोरोना प्रतीबंधत्मक रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
– डॉ. पावसे म्हणाले आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन यांच्या बरोबरच पत्रकार ही एक प्रकारची देशसेवा करीत आहेत कोरोना च्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना अनेक ठिकाणी बातमी साठी जावे लागते. त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे फार जरुरीचे आहे. याकरिता पत्रकारांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना होमिओपॅथिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन मगदूम, डॉ. वैशाली पावसे यांच्यासह वारणा-कोडोली परिसरातील पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांना डॉ. श्यामप्रसाद पावसे यांचे कडून होमिओपॅथिक औषधे मोफत वाटप
103