कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी १२ हजार १४७ जणांची तर बाहेर जाण्यासाठी ८ हजार ९४० जणांची वर नोंदणी

by Admin

जिल्ह्यात येण्यासाठी १२ हजार १४७ जणांची तर बाहेर जाण्यासाठी ८ हजार ९४० जणांची bit.ly/Kopentryexit वर नोंदणी -जिल्हाधिकारी दौलत देसाई
-कोल्हापूर(प्रतिनिधी) कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी १२ हजार १४७ जणांनी तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या ८ हजार ९४० जणांनी प्रशासनाने तयार केलेल्या bit.ly/Kopentryexit या लिंकवर आपली माहिती भरली. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २१ हजर ११८ जणांनी नोंदणी केल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
– लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने bit.ly/Kopentryexit ही लिंक तयार केली आहे. यावर माहिती भरण्याचे आवाहन काल केले होते.
– आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत यावर जिल्ह्यात प्रवेशासाठी १२ हजार १४७ जणांनी, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ८ हजार ९४० जणांनी तर ३१ जणांनी जाणे वा येणे अशी कोणतीच माहिती न देता या लिंकवर नोंदणी केली आहे.

You may also like

1 comment

शुभांगी संजय परीट (सरपंच ग्रामपंचायत शिवारे मे 3, 2020 - 3:31 pm

साहेब शिवारे ता, शाहूवाडी या गावाची लोकसंख्या 1590 इतकी आहे, मुंबई पुणे व इतर ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती 40 हुन अधिक असतील तसेच शिवारे व माणगांव या दोन्ही गावची जि प शाळा एकच असून तिथे खोल्यांची संख्या अपुरी आहे, तरी तिथं संडास बाथरूमची सोय नसून स्त्रिया पुरुष ठेवणं अशक्य आहे, त्यासाठी मार्ग दर्शन मिळावं ही विन्नती,

Reply

Leave a Comment