कोल्हापूर

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग- अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने

by संपादक

– प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग – दिवस व वेळापत्रकानुसारच पैसे काढता येणार – अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने – कोल्हापूर(प्रतिनिधी) प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये बँकांकडे आजपासून वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, हे पैसे काढण्यासाठी शासनाने दिवस आणि वेळापत्रक आखून दिले असून त्यानुसारच रक्कम काढता येईल,अशी माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.
– कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित केला असून गोरगरीब माहिलांचे हित डोळयासमोर ठेऊन शासनामार्फत एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात प्रतिमहिना रुपये पाचशे इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा करण्यात येत आहे. यानुसार प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर प्रती महिना रुपये पाचशे इतकी रक्कम जमा करण्यात येत आहे. यानुसार मे महिन्याची रक्कम शासनामार्फत आजपासून सर्व संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले असून त्यानुसार पैसे काढण्याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्री.माने यांनी केले आहे. – १) दिवस पहिला :- 4 मे या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ० किंवा १ ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. – २) दिवस दुसरा:- 5 मे या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. – ३)दिवस तिसरा:- 6 मे या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ४ किंवा ५ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. ४) दिवस चौथा :- 8 मे या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ६ किंवा ७ ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. ५)दिवस पाचवा :- 11 मे या दिवशी ज्या खाते क्रमांकांचा शेवट ८ किंवा ९ ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल, असे वेळापत्रक असून प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी न करता तोंडाला मास्क बांधून तसेच सोशल डिस्टन्सींग पाळून योग्य ती दक्षता व खबरदारी घेऊन वरील वेळापत्रकानुसार नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.

You may also like

1 comment

Pratap Chougule मे 2, 2020 - 9:18 pm

जर एख्याद्याच्या खात्यात पैसे जमा नसल्यास काय ककरायचे

Reply

Leave a Comment