अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पत्रकार यांना आयुर्वेद काढा व औषधाचे मोफत वाटप
– यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम
– कोडोली (प्रतिनिधी )देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस ,आशा स्वयंसेविका व पत्रकार हे दिवस-रात्र समाजाची सेवा करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे पाहून यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने आशा स्वयंसेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आयुर्वेद काढा व आयुर्वेदिक औषधांचे मोफत वाटप यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक डॉ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
– आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय व आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालय यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी आशा स्वयंसेविका व केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोवीड योद्धा म्हणून सन्मान केला .यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले,डॉ. सूर्यकिरण वाघ यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी आशा स्वयं सेविका व कर्मचारी , पत्रकार यांची आयुर्वेद रुग्णालयात आरोग्य तपासणी केली तर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी केली .
– यावेळी डॉ.जयंत पाटील यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी,पोलीस अधिकारी व कर्मचारी ,आशा स्वयंसेविका ,पत्रकार यांना कोवीड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, सरपंच शंकर पाटील ,प्रवीण जाधव ,डॉ. अभिजित इंगवले, डॉ. सुनील कोळेकर यांच्यासह आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.
https://youtu.be/0mQGlaSAeHc
97