कोल्हापूर

कोरे आर्किटेक्चर तर्फे जेईई व नाटा परीक्षेकरीता मोफत ऑनलाईन सराव परीक्षेची सोय

by संपादक

कोरे आर्किटेक्चर तर्फे जेईई व नाटा परीक्षेकरीता मोफत ऑनलाईन सराव परीक्षेची सोय
– कोडोली (प्रतिनिधी) वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यावतीने आर्किटेक्चर ला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता नाटा व जेईई (पेपर ०२) या परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन व सराव परीक्षेची सोय करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी… https:// forms. gle/LFPVWaio1YXZCbsKA…ह्या लिंक वर जाऊन नोंदणी करावी त्यानंतर महाविद्यालय एसएमएस’द्वारे विद्यार्थ्यांना युजरनेम, पासवर्ड व महत्त्वाच्या सूचना पठवेल अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या आर्किटेक्ट रीना चव्हाण व समन्वयक प्राध्यापक बी. व्ही. बिराजदार यांनी दिली.
– श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९ पासून तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सुरू करण्यात आले असून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्था अद्यायावत सोयी सुविधांनी सुसज्ज आहेत .त्याच प्रमाणे आर्किटेक्चर महाविद्यालय पूर्णपणे अद्यायावत आहे .उच्चशिक्षित व अनुभवी स्टाफ, सुसज्ज इमारत प्रयोग शाळा वाचनालय ,फोर जी वाय-फाय ,जिमखाना , मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह अशा सर्व सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध आहेत .तसेच शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात घेता येतो.
– सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा वारसा पुढे चालवीत आम. डॉ. विनय कोरे यांनी आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण व निमशहरी परिसरातील विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर शिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी या सुविधांचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आम. डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी केले आहे.

You may also like

Leave a Comment