महाराष्ट्र

जगावेगळा लोक शिक्षक संस्थापक- कर्मवीर अण्णा

by संपादक

जगावेगळा लोक शिक्षक संस्थापक- कर्मवीर अण्णा
– आज कर्मवीर अण्णा यांचा स्मृतीदिन ९ मे १९५९ रोजी अण्णांचे निधन झाले .अण्णांनी अतिशय कष्टातून , त्यागातून रयत शिक्षण संस्था चालवली .सुरुवातीच्या काळी अण्णा प्रत्येक विद्यार्थ्यास जातीने ओळखत असत. सतत प्रवास ,कामाची दगदग म्हणून १९४४ मध्ये अण्णांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. विद्यार्थी आणि सहकारी यांना अण्णांची काळजी वाटू लागली . म्हणूनच अण्णांच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी अण्णांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी गाडी देण्याचे ठरविले. मात्र अण्णा म्हणाले या गाडीचा खर्च ,ड्रायव्हरचा पगार, संस्थेला पेलवणार नाही त्यामुळे मला गाडीची गरज नाही. शेवटी सर्व माजी विद्यार्थी व हितचिंतक यांनी असा निर्णय घेतला की आपण अण्णांना गाडी तर देऊच पण त्याच बरोबर ड्रायव्हरचा पगार ,पेट्रोल व इतर देखभाल व खर्चासह गाडी भेट देऊ मग एका बँकेत खाते उघडून त्यांनी ही रक्कम जमा केली.अशा रीतीने सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिवशी बंडू गोपाळ मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली हा मोटर दान कार्यक्रम पार पडला .त्या गाडीची किंमत त्याकाळी दहा हजार पाचशे अठ्ठ्यांनव रुपये होती.तर गाडीचा नंबर बी एक्स एल ३५०१ होता. या गाडीच वैशिष्ट्य सांगताना गाडी चे ड्रायव्हर माजी सैनिक उद्धव कामटे सांगतात या गाडीच्या डिकीत एक टिकाव, फावडे व दोन-तीन घमेले हे साहित्य असायचे. त्याकाळी उत्तर महाराष्ट्र धुळे , दक्षिण महाराष्ट्र बेळगाव तर पूर्वेकडील अमरावती ते पश्चिमेकडील रत्नागिरी अशा पद्धतीने अण्णांचा आहोरात्र प्रवास चालायचा .ग्रामीण भागात त्यावेळी खराब रस्ते तर काही ठिकाणी रस्तेच नाही अशा परिस्थितीत सुद्धा अण्णांचा दौरा थांबत नसे कारण जिथे रस्ता नसायचा तिथं अण्णा स्वतः गाडीत ठेवलेल्या वस्तू आणून ड्रायव्हर बरोबर माती टाकून गाडी जायला रस्ता तयार करत.तसेच काही किरकोळ दुरुस्ती करावी लागली तर अण्णा स्वतः माझ्या बरोबर हे काम करत असत. स्वतः काम करणारा पहिला संस्थापक मी पहिल्यांदा पहिला हे आवर्जून सांगतात.सातारा जिल्ह्यातील संस्थेच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो. त्या वेळचे महाराष्ट्राचे गव्हर्नर अण्णांच्या बरोबर होते. माणगंगा नदी जवळ आलो तेव्हा वळवाचा पाऊस सुरू होता . नदीचं पाणी रस्त्यावरून वाहताना पाहून गव्हर्नर म्हणाले .अण्णा अशा पाण्यातून मी काही गाडीतून येणार नाही.ड्रायव्हर अण्णांना म्हणाले अण्णा मुलांसाठी आपल्याला गेलंच पाहिजे. अण्णानी विचारले यावर काही उपाय ? तेव्हा मी म्हणालो अण्णा या गाडीचे इंजिन वर घेण्याची या गाडीत सुविधा आहे. ते वर घेण्याची गरज आहे .त्याप्रमाणे त्याने गाडीचे इंजिन वर घेतले व ड्रायव्हरने गाडी मागे घेऊन जोरात नेली. अण्णा कार्यक्रम उरकून परत विश्रामगृहाकडे आले . गव्हर्नर साहेब सुद्धा विश्रामगृहावर होते. त्यांनी कार्यक्रमाविषयी माहिती घेतली आणि अण्णांना म्हणाले आपल्या संस्थेची जी काही कामे असतील ती मी करतो .मात्र विनंती आहे की तुमचा ड्रायव्हर मला पाहिजे .अण्णा म्हणाले तो येत असेल जरूर त्याला घेऊन जा .माझी काहीही हरकत नाही. साहेबांनी मला बोलावले आणि म्हणाले तुला मी सरकारी सेवेत घेतो .पगार चांगला मिळेल .माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून चल. यावर तो म्हणाला .साहेब मी रोज सकाळी उठल्यावर दोन अगरबत्ती लावतो . एक आई-वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरी जो माझा अन्नदाता म्हणजेच आमच्या अण्णांसाठी. मला आपल्या सरकारी नोकरीची गरज नाही.अण्णांबरोबर सेवा करणे हेच मी माझे भाग्य समजतो. अशा निष्ठावान सेवकांमुळे संस्था शंभर वर्षे पूर्ण करू शकली . अशा विद्यार्थीप्रिय लोकशिक्षक (संस्थापक) यांच्याविषयी आम्ही एवढेच म्हणू इच्छितो की , शंकराने भगीरथ प्रयत्न करून गंगा पृथ्वीवर आणली ,हे आपण ऐकतो किंवा पुस्तकात वाचतो मात्र प्रत्यक्षपणे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात आपल्या भगीरथ प्रयत्नाने ज्ञानाची गंगा घरोघरी आणण्याचे काम आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहतो आहोत. अण्णांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण महाराष्ट्रात घरोघरी ज्ञानेश्वर निर्माण झाले. ही जादू अण्णांनी केलेली आहे म्हणूनच पंजाबराव देशमुख सुद्धा म्हणतात, जगातील कोणत्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीरांना सर्व विद्यापीठांनी पदव्या दिल्या तरी त्यांच्या कार्याचा गौरव कमीच होईल. आज त्यांच्या स्मृतिदिनी आम्ही आदर पूर्वक आदरांजली अर्पण करतो .
– प्रा एस आर पाटील
– संस्थापक स्मिता पाटील विद्यामंदिर
– वारजे माळवाडी, पुणे

You may also like

Leave a Comment