विहिरीचे बांधकाम कोसळून तिघे गाडले तर दोघे जखमी
– कोडोली (प्रतिनिधी) कोडोली-काखे रोडवरील रमणे नावाने ओळखले जाणाऱ्या परिसरात श्री.वारकरी यांच्या मळ्यामधील विहिरीच्या डागडुजी बांधकामाचे काम चालू असताना बांधकामसह भराव विहिरीत ढासळल्याने विहीर मालकासह तिघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले तर दोघे जखमी झाले आहेत.महेश वारकरी, सिकंदर जमादार , अमोल सदाकळे, (रा.कोडोली ता.पन्हाळा )अशी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्याची नावे आहेत.
– या बाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोडोली काखे रोड वरील रमणे परिसरातील श्री. वारकरी यांच्या मळ्यामधील चाळीस फूट उंचीची जुन्या विहिरीचे बांधकाम खराब झाले होते ते दुरुस्त करण्याचे कंत्राट संजय केशव यशवंत याने घेतले होते. आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान काम संपवून नेताजी पाटोळे वर येत असताना त्याला भराव खचताना दिसत होता. ही बाब तो विहिरीच्या वर उभे असलेल्या लोकांना सांगत असताना भराव तुटून विहिरीत पडल्याने विहिरी कडेला उभे असलेले सिकंदर जमादार , अमोल सदाकळे, महेश वारकरी, नेताजी पाटोळे हे ढिगाऱ्या बरोबर खाली गेले असता तेथील स्थानिक नागरिक विजय पाटील,एम.डी. पाटील,आदिक पाटील,आनंदा पाटील ,सुरेश पाटील यांनी नेताजी पाटोळे व प्रकाश यशवंत खोचिकर यांना बाहेर काडून त्यांना तातडीने वारणेचा वाघ फाउंडेशनच्या रुग्ण वाहिकेने येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले. तर रात्री उशिरापर्यंत दोन जीसीपी, दोन पोक पोकल्याडच्या सहाय्याने ढिगाऱ्या खाली अडकलेल्या तिघांचा शोध चालू आहे. यावेळी पन्हाळा प्राताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेडगे, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक अनिल कदम, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, सर्कल अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी, सरपंच शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
– यावेळी येथे परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गर्दीस रेसकोर्स फोर्स, गनिमी कावा, कोडोली पोलीस व स्वयंम सेवक गर्दी पांगवत होते. रात्री उशिरा पर्यंत ढिगाऱ्या खाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम जिल्हा आपत्ती प्रमुख प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू फोर्स कोल्हापूर यांचे काम चालू होते.
कोडोलीत विहिरीचे बांधकाम कोसळून तिघे गाडले तर दोघे जखमी
108
previous post