122
फिरत्या कोव्हीड तपासणी वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
– कोल्हापूर(प्रतिनिधी) फिरते कोव्हीड तपासणी वाहनाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
– कोल्हापूर कार्यालयात कार्यरत असणारे मोटर वाहन निरीक्षक तथा केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून हे कोविड फिरते तपासणी वाहन तयार झाले आहे. आज त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ स्टीव्हन अल्वारिस आदी उपस्थित होते.