कोल्हापूर

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडून गुलाब पुष्प देवून शुभेच्छा

by संपादक

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडून गुलाब पुष्प देवून शुभेच्छा
– कोल्हापूर ( प्रतिनिधी) जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने येथील सीपीआर रुग्णालयास आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देवून रुग्णालयातील परिचारिकांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
– कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत, यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आह. कोरोना विरुद्धच्या या लढाईत परिचारिका आघाडीवर राहून आपल्या जिवाची पर्वा न करता श्रम करीत आहेत ही बाब अतिशय कौतुकाची आहे, अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
– यावेळी सीपीआर च्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम, डॉ. सुनीता रामानंद, डॉ. डी.ए.पावले, शामल पुजारी, चारूबाला साळोखे, नेहा कापरे, सुमन पोवार, सुरेखा गावडे, विनय खोडवे आदी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment