घरगुती व्यावसायिक शेतकरी यांचे लाईट बिल माफ व्हावे, कोडोली भाजपाची मागणी
– कोडोली (प्रतिनिधी) सध्या देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचे संकट मोठ्या प्रमाणात पसरले पसरले आहे. त्यामुळे देशात गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक उद्योगधंदे, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे अनेक कामगार घरी आहेत तसेच उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना दिलासा देणे गरजेचे असून कोडोलीतील सर्व उद्योग धंदे, व्यवसायिक, शेतकरी, कामगार व ग्रामपंचायतीचे एप्रिल व मे मधील संपूर्ण वीज बिल माफ व्हावे अशा आशयाचे निवेदन सहाय्यक अभियंता, महावितरण शाखा कोडोली यांना भारतीय जनता पार्टी कोडोली शाखा यांच्या वतीने देण्यात आले.
– कोरोनाच्या महामारी मुळे व्यापारीवर्ग,कारखानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे .या बरोबर भाजीपाला विक्रीवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पर्यंत कोडोली येथील सर्व ग्राहकांनी वेळच्यावेळी वीज बिले भरली आहेत तरी कोरोना महामारी संकट पाहून शेतकरी, व्यापारी, कारखानदार व सर्वसामान्य नागरिकांचे एप्रिल व मे २०२० चे वीज बिल माफ करावे. या वेळी कोडोली शहर भाजपाचे अध्यक्ष उदय पाटील ,अविनाश चरणकर, महेश जाधव, राजदीप सावंत उपस्थित होते
94