कोल्हापूर

१४ ते १६ मे कालावधीत कोडोली शंभर टक्के बंद

by संपादक

१४ ते १६ मे कालावधीत कोडोली शंभर टक्के बंद – संस्था अलगीकरण मध्ये ११ व्यक्ती असून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक अलिगीकरणांत ठेवण्यात येईल
– कोडोली (प्रतिनिधी )सातवे ता. पन्हाळा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने कोडोली ग्रामस्थर समितीने तातडीने बैठक घेऊन कोडोली गाव १४ ते १६ मे पर्यंत शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला.
– कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुका आजपर्यंत कोराना मुक्त होता पण नुकताच सातवे येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शासकीय यंत्रणा गतिमान झाली. हा रुग्ण कोडोली गावातून येऊन गेला असल्याने कोडोली ग्रामस्थर समितीची तातडीची बैठक होऊन वरील निर्णय घेण्यात आला .या लॉकडाउन मधून शेती औषध दुकान, मेडिकल ,रूग्णालय व दूध संस्था यांना वगळले असून इतर सर्व व्यवसाय १४ मे पासून १६ मे पर्यंत बंद राहतील. या आदेशाचा व्यवसायिकांनी भंग केल्यास सात दिवस दुकान बंद करण्याचा इशारा ग्रामस्थर समितीच्यावतीने देण्यात आला आहे .
– कोडोलीत सध्या संस्था अलगीकरण मध्ये ११ व्यक्ती असून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक अलिगीकरणांत ठेवण्यात येईल असे समितीच्या वतीने सांगण्यात आले .तसेच आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात एकही रुग्ण सापडले नसल्याने पन्हाळा या ठिकाणी उभारलेली अद्यायावत लॅब प्रशासनाने सुरू केली नव्हती. पण ही लॅब लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थर समितीकडून करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थर समितीचे अध्यक्ष सरपंच शंकर पाटील, ग्रामसेवक ए .वाय .कदम, सर्कल अभिजित पवार, तलाठी अनिल पवार ,सर्व सदस्य,आरोग्य खात्याचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

You may also like

Leave a Comment