Home राष्ट्रीय कोविड 19 च्या रुग्णांसंदर्भात गृह अलगीकरणाविषयी, रुग्णांसाठी व रुग्णांची काळजी घेणारे व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना

कोविड 19 च्या रुग्णांसंदर्भात गृह अलगीकरणाविषयी, रुग्णांसाठी व रुग्णांची काळजी घेणारे व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना

by संपादक

कोविड 19 च्या अति सौम्य अथवा पूर्वलक्षणे असलेल्या रुग्णांसंदर्भात गृह अलगीकरणाविषयी, रुग्णांसाठी आणि रुग्णांची काळजी घेणारे व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना
– नवी दिल्ली(प्रतिनिधी)कोविड- 19 च्या अति सौम्य अथवा पूर्वलक्षणे असलेल्या रुग्णांच्या गृह अलगीकरणाविषयी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुधारित मार्गदर्शक सूचना 10 मे 2020 रोजी जारी केल्या आहेत.
– मंत्रालयाने यापूर्वी 27 एप्रिल 2020 रोजी कोविड-19 च्या अति सौम्य/पूर्व लक्षणं असलेल्या रुग्णांसाठीच्या गृह अलगीकरणाविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या सूचनांच्या जागी आता 10 मे 2020 रोजी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
–यानुसार, अति सौम्य अथवा पूर्वलक्षणे असलेल्या रुग्णांच्या घरात स्व-अलगीकरणासाठी आवश्यक सुविधा आहे त्यांच्यासाठी गृह अलगीकरणाचा पर्याय उपलब्ध असेल. अश्या रुग्णांनी तसेच त्यांची काळजी घेणारे व्यक्तींनी काय करावे आणि काय करु नये, अशा आशयाच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

– कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी सूचना
– मास्क : आजारी व्यक्तीबरोबर एकाच खोलीत असताना सेवा करणाऱ्याने ट्रिपल लेयर वैद्यकीय मास्क घालायला हवा. मास्कच्या समोरील भागाला स्पर्श करू नये किंवा हाताळता कामा नये. जर श्वासोच्छवासामुळे मास्क ओला किंवा खराब झाला तर तो त्वरित बदलणे आवश्यक आहे. वापरल्यानंतर मास्क टाकून द्या आणि मास्क टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

– त्याने / तिने स्वतःचा चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळावे.

– आजारी व्यक्ती किंवा त्याच्या जवळच्या वातावरणाशी संपर्क आल्यानंतर हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

– अन्न तयार करण्यापूर्वी आणि केल्यानंतर, खाण्यापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि जेव्हा कधी हात घाणेरडे दिसत असतील तेव्हा हाताची स्वच्छता देखील पाळली पाहिजे. कमीतकमी 40 सेकंदांपर्यंत हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करावा. जर डोळ्यांनी हात खराब दिसत नसतील तर अल्कोहोल-आधारित हॅन्ड रब वापरू शकता.

– साबण आणि पाणी वापरल्यानंतर हात सुकवण्यासाठी डिस्पोजेबल पेपर टॉवेल्सचा वापर करणे हितावह आहे. ते उपलब्ध नसल्यास स्वच्छ कापडाचे टॉवेल्स वापरा आणि ते ओले झाल्यावर त्याऐवजी दुसरे वापरा.

– रुग्णाशी संपर्क: रुग्णाच्या शरीरावरील द्रवपदार्थाशी थेट संपर्क टाळा, विशेषत: तोंडातील किंवा श्वसन स्राव. रुग्णाला हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरा. हातमोजे घालण्यापूर्वी आणि काढल्यानन्तर हात स्वच्छ धुवा.

– त्याच्या आजूबाजूला संभाव्य दूषित वस्तूंचा संपर्क टाळा (उदा. त्याची सिगारेट वापरणे, जेवणाची भांडी, ताटे, पेये, वापरलेले टॉवेल्स किंवा चादरी टाळा).

– रुग्णाला त्याच्या खोलीत जेवण दिले जावे.

– रूग्णाने वापरलेली भांडी आणि ताटे हातमोजे वापरून साबण / डिटर्जंट आणि पाण्याने स्वच्छ करावीत. भांडी आणि ताटे पुन्हा वापरली जाऊ शकतात. हातमोजे काढून टाकल्यानंतर किंवा वापरलेल्या वस्तू हाताळल्यानंतर हात स्वच्छ करा.

– साफसफाई करताना किंवा रुग्णाने वापरलेल्या पृष्ठभागाला, कपड्यांना किंवा चादरींना हाताळताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज वापरा. ग्लोव्हज घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

– रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने हे सुनिश्चित करावे की रुग्णाकडून निर्धारित उपचारांचे पालन केले जात आहे.

– काळजी घेणारा आणि सर्व जवळच्या नातलगांनी दररोज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, आपले तापमान तपासावे, आणि कोविड-19 (ताप / खोकला / श्वासोच्छवासाचा त्रास ) अशी काही लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राला कळवावे .

– कोविड बाधित रुग्णासाठी सूचना

– रुग्णाने नेहमीच ट्रिपल लेयर मेडिकल मास्क वापरला पाहिजे. जर तो ओला झाला असेल किंवा खराब दिसत असेल तर 8 तासांच्या आधी किंवा 8 तासांनंतर काढून टाका.
– मास्क केवळ 1 टक्के सोडियम हायपो-क्लोराइटसह निर्जंतुकीकरणानंतर टाकून द्यावा.
– रूग्णाने एका विशिष्ट खोलीत राहावे आणि घरात इतर लोकांपासून दूर रहाणे आवश्यक आहे, विशेषत: ज्येष्ठ लोक आणि उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार , मूत्रपिंडाचा आजार इत्यादी आजार असलेले लोक .
– रुग्णाने विश्रांती घ्यावी आणि पुरेसे हायड्रेशन टिकवण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे.
– प्रत्येक वेळी श्वसनासंबंधी शिष्टाचाराचे पालन करा.
– हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी 40 सेकंद धुवावेत किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ करावे.
– इतर लोकांबरोबर वैयक्तिक वस्तू वापरू नका.
– 1टक्के हायपोक्लोराइट द्रावणासह खोलीतील पृष्ठभाग स्वच्छ करा ज्याला बहुतेक वेळा स्पर्श केला जातो (टेबलटॉप्स, डोअर नॉब्ज, हँडल्स इ.)
– रुग्णाने डॉक्टरांच्या सूचना आणि औषधोपचाराच्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
– रुग्णांनी दैनंदिन तापमान तपासावे तसेच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि मार्गदर्शक सूचनांत नमूद केल्याप्रमाणे लक्षणात काही बिघाड आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

You may also like

Leave a Comment