राष्ट्रीय

कार्बन उत्सर्जन आणि आवाजाच्या मानकांचे पालन करण्याबाबत मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणांसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन

by संपादक

कार्बन उत्सर्जन आणि आवाजाच्या मानकांचे पालन करण्याबाबत मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणांसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन
– नवी दिल्ली (प्रतिनिधी) कार्बन उत्सर्जन आणि आवाज मानकांच्या अनुपालनासंदर्भात मोटार वाहन नियमांमधील प्रस्तावित सुधारणांसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व संबंधित नागरिकांना केले आहे. या संदर्भातील अधिसूचना 11 तारखेला जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना www.morth.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
– 11 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेचा मसुदा जीएसआर 292 (ई) अर्ज 22 च्या सुधारणेसंदर्भात आहे. ई रिक्षा किंवा ई गाड्यांसाठी नोंदणीकृत ई रिक्षा किंवा ई कार्ट संघटनांकडून किंवा उत्पादक किंवा आयातदाराने उत्सर्जन आणि ध्वनी मानकांच्या पुरततेसंदर्भात जारी करण्यात येणाऱ्या रस्ता योग्यता प्रमाणपत्रासंदर्भात हा मसुदा आहे. हा अर्ज सुलभ करण्यासाठी दोन सारणीऐवजी(टेबल ) एकच सारणी देण्यात आली आहे आणि पुढील टप्प्यातील उत्सर्जन मानकानुरूप काही आणखी प्रदूषक मापदंड समाविष्ट करण्यात आले आहेत.
– यासंदर्भातील सूचना किंवा टिपणी सहसचिव (एमव्हीएल), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-100001 (ईमेल: jspb-morth@gov.in) इथे 10 जून 2020 पर्यंत पाठवता येतील.

You may also like

Leave a Comment