कोडोली येथून ८५ परप्रांतीय उत्तरप्रदेशकडे रवाना
– कोडोली( प्रतिनिधी )कोडोली परिसरात कामानिमित्त आलेल्या उत्तरप्रदेश येथील ८५ कामगारांना नुकतेच त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. गावी जाण्यासाठी कुटुंबासह कामगार कोडोली बस स्थानक मध्ये जमले होते .बस कोल्हापूरकडे रवाना होतात घरची ओढ लागून राहिलेल्या परप्रांतीयांचे चेहरे आनंदामुळे खुललेले पाहायला मिळाले.
– कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे कामानिमित्त कोडोली ता. पन्हाळा येथे आलेले अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था तालुका प्रशासनाने केली होती.८५ परप्रांतीयांना कोडोली येथून तीन बसेस मधून कोल्हापूर येथे सोडण्यात येणार असून तेथून श्रमिक एक्स्प्रेस मधून त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे.
– यावेळी कोडोली सर्कल अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी,भिमराव पाटील,आप्पासो चौगुले आदी उपस्थित होते.
79