कोल्हापूर

कोडोली येथे आशा स्वयंसेविकेस शिवीगाळ, आशा स्वयंसेविकांचे आंदोलन,माफी नाम्याने आंदोलन मागे

by संपादक

कोडोली येथे आशा स्वयंसेविकेस शिवीगाळ, आशा स्वयंसेविकांचे आंदोलन,माफी नाम्याने आंदोलन मागे
– कोडोली (प्रतिनिधी) येथील महापुरे गल्लीमध्ये मुंबईहून सौ. कल्पना महापुरे व त्यांचा मुलगा आल्याचे समजल्यावर आरोग्य सेविका श्रीमती नदाफ, श्रीमती चोपडे व आशा स्वयंसेविका सुषमा गायकवाड माहिती घेण्यासाठी गेले असता कल्पना महापुरे यांचे पती राजू महापुरे यांनी शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी जि. प. सदस्य विशांत महापुरे यांनी समजावून सांगितल्याने वरील सेविका परत गेल्या. परंतु पुन्हा दुसर्‍या दिवशी राजू महापुरे यांनी आशा स्वयंसेविका यांना शिवीगाळी करत गल्लीत न येण्याची धमकी दिल्याने सर्व सेविकांनी राजू महापुरे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय काम करणार नाही असे निवेदन पन्हाळा पंचायत समिती सभापती सौ. गीतादेवी पाटील व ग्रामस्थर समितीचे अध्यक्ष , सरपंच शंकर पाटील यांना दिले.
– आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका कोरोना साथीच्या काळात अहोरात्र काम करत आहेत .अशा प्रकारच्या लोकांमुळे आम्हाला काम करणे मानसिक दृष्ट्या त्रासदायक झाले असल्याने राजू महापूरे यांनी आमच्या समोर येऊन माफी मागावी व पुढे असा प्रकार घडणार नाही असे सांगावे लागेल तरच आम्ही काम करू असा पवित्रा कर्मचारी यांनी घेतल्याने पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. गीतादेवी पाटील, सरपंच शंकर पाटील, ग्रामसेवक ए.वाय. कदम व सर्व सेविकांची ग्रामपंचायत मध्ये बैठक झाली. यावेळी राजू महापुरे याने या सर्वासमोर माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

You may also like

Leave a Comment