कोल्हापूर

क्वारंटाईनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करताहेत खासदार धैर्यशिल माने

by संपादक

क्वारंटाईनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करताहेत खासदार धैर्यशिल माने
– निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत
– कोल्हापूर (प्रतिनिधी)रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशिल माने हे गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे. शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यापासून याची सुरूवात होणार आहे.
– रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार धैर्यशिल माने यांनी नवा पॅटर्न करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये ते राहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे घर रिकामे करायचे आणि त्या घरात रहात असणाऱ्या त्यांच्या सदस्यांनी आपल्या भाऊबंदांकडे किंवा शेजाऱ्यांकडे रहायचे. पुढील १४ दिवस संपर्कात यायचे नाही. त्या घरावर फलक लावून त्यावर अलगीकरण कालावधी लिहायचा. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय त्यांच्या घरच्या लोकांनीच करायची.
– येणाऱ्या लोकांची सोय करण्यात प्रशासनाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या मदतीने या नव्या पॅटर्नची सुरूवात शाहुवाडी-पन्हाळा येथून सुरूवात करत आहोत. घरच्या लोकांनी आपल्या, गावाच्या सुरक्षिततेसाठी घर रिकामे करून बाहेरून येणाऱ्या आपल्याच लोकांना द्यावे आणि काही दिवस दक्षता घ्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशिल माने यांनी या नव्या पॅटर्नच्या निमित्ताने केले आहे.
– Ø प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत
– Ø ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामास मदत
– Ø कुटुंबाला पर्यायाने गावाला धोका होणार नाही
– Ø सामाजिक बांधिलकी, एकोपा वृध्दींगत होण्यास मदत
– Ø अलगीकरणाच्या तंतोतंत पालनास होणार मदत

You may also like

1 comment

Nitin Bhusari मे 18, 2020 - 5:29 pm

Very brlliant idea sir.

Reply

Leave a Comment