Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

50 टक्के प्रवासी क्षमतेवर जिल्हा अंतर्गत बस सेवा, क्रीडा संकुले ,तीन आणि चारचाकी 1+2 परवानगी, सलूनला सशर्त परवानगी
– शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट गृहे, सर्व हॉटेल प्रतिबंधित कोल्हापूर (प्रतिनिधी) सर्व हॉटेल,रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील. (अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून.) तर क्रीडा संकुले आणि मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळया जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. 50{85635deba076e33c35fde6845e1751f06568f47b58ee58a76ea242b5d155e0c7} प्रवासी क्षमतेसह जिल्हा अंतर्गत बस सेवा शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपाययोजनेसह सुरू करता येईल. केश कर्तनालय व स्पा यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी याबाबत आज आदेश दिले आहेत.
– कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन बंदी आदेशाची मुदत दिनांक 31 मे 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. लॉकडाऊन व बंदी आदेशाच्या कालावधीत दिनांक 22/05/2020 पासून खालील प्रमाणे आदेश लागू राहतील.
– अ) प्रतिबंधित / बंद क्षेत्रे खालील प्रमाणे असतील.
–1. कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमा बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील व या कालावधीत आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतुक वगळून उर्वरीत सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल.
– 2. सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणे व रेल्वे सेवा प्रतिबंधीत असतील.
– 3. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक/ प्रशिक्षण देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधीत असेल.
– 4. सर्व आतिथ्य सेवा सुविधा (गृहनिर्माण सेवा / पोलीस/ सरकारी अधिकारी/ आरोग्यसेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती यांच्या साठी आणि अलगीकरणासाठी वापरल्या गेलेल्या वगळून.) प्रतिबंधीत असेल. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील. (अत्यावश्यक सेवा व जिवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून.)
– 5. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा/ करमणूक/ शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील.
– 6. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा धार्मिक कार्यक्रमांना कडक निर्बंध राहील.
– 7. अत्यावश्यक नसणाऱ्या कारणांसाठी नागरिकांची व अत्यावश्यक व जीवनावश्यक वैद्यकीय सेवा व्यतीरिक्त इतर वाहनांची जिल्हांतर्गत हालचाल सायंकाळी 07.00 ते सकाळी 07.00 या कालावधीत प्रतिबंधित असेल.
–8. जीवनावश्यक वस्तू व आरोग्याची कारणे वगळून 65 वर्षावरील व्यक्ती , गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व दहा वर्षा खालील मुले यांना घराबाहेर पडणे प्रतिबंधीत असेल.
– 9. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी 09.00 पूर्वी व सायंकाळी 05.00 नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करणेचे आदेश देणेत येतील.
– 10. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटका, तंबाखू, सुपारी खाणे व थूकणे प्रतिबंधित आसेल.
– 11. वैद्यकीय कारणांशिवाय किंवा एमएचए द्वारे परवानगी असलेल्या सेवा व्यतिरिक्त्व्य क्तींची आंतरराज्यीय वाहतूक प्रतिबंधित असेल.
– 12. दोन जिल्ह्यातील व्यक्ती व वाहनांची हालचाल, परवानगी दिलेल्या बाबी वगळून, प्रतिबंधीत असेल. सार्वजनिक ठिकाणी संस्था किंवा आस्थापना पाच किंवा त्यापेक्षा जास्ती व्यकतींना एकत्रीत येण्यास प्रतिबंधित करतील. त्याच प्रमाणे सर्व प्रकारची वाहतूक व सार्वजनिक ठिकाणी सामाजिक सुरक्षीत अंतर व इतर प्रतिबंधक उपाय योजना यांचे पालन केले जाईल.
– 13. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही करणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

– नॉन रेड झोनः
– मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील No. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 19/05/2020 रोजीच्या आदेशाच्या कलम 4 मध्ये नमूद नसलेल्या सर्व बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी रेड झोनमध्ये नसलेल्या विभागामध्ये खालील अटीच्या आधारे सुरू असणेस परवानगी असेल.
– 1) परवानगी असलेल्या बाबींना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही.
– 2) क्रिडा संकुले आणि मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळया जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहीतल. पंरतु प्रेक्षक आणि सामूहिक क्रिडा प्रकार , व्यायामप्रकार यांना परवानगी असणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करणेस हरकत नाही.
– 3) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालीलप्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतुक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवाशी व चालक/वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. i. दुचाकी: 1 स्वार ii. तीन चाकी: 1 + 2 iii. फोर व्हीलर: 1 + 2
– 4) जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50{85635deba076e33c35fde6845e1751f06568f47b58ee58a76ea242b5d155e0c7} प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपाययोजनेसह सुरू करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
– 5) आंतर जिल्हा बससेवेबाबत स्वंतत्र पणे आदेश निर्गमित करणेत येतील.
– 6) यासह जोडलेले प्रपत्र 3 सोयीसाठी आहे आणि ते शासनाच्या मुख्य आदेशासह वाचले जाणे आवश्यक आहे.
– 7) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडील दि. 19/05/2020 रोजीच्या पत्रानुसार शासनाने पारीत केलेले आदेश क्र. एफएलआर-520/कोव्हीड/प्र.क्र.4/राउशु-2, दि. 19/05/2020 नुसार राज्यातील मुंबई विदेशीत मद्य नियम, 1953 अंतर्गत मंजूर केलेल्या अनुज्ञप्ती नमुना एफएल-3 अनुज्ञप्तीकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत अथवा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सीलबंद विक्री करण्यास सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत परवानगी देण्यात येत आहे. उपरोक्त अ मधील नमुद प्रतिबंधीत बाबी वगळता उर्वरीत सर्व बाबींना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील No. DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 19/05/2020 रोजीच्या आदेशामध्ये नमुद प्रतिबंध व सूट लागू असेल. या आदेशाची अंमलबजावणी उद्या दिनांक 22 मे 2020 रोजी पासून करण्यात यावी.
– कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश
–1. सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक असेल. – 2. राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करणेत आलेल्या नियमानूसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनूसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल.
– 3. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल.
– 4. विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.
– 5. अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.
– 6. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास परवानगी असणार नाही.
– 7. दुकानामध्ये/ दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती/ गिऱ्हाईक मध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त दिशानिर्देश
– 8. शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळणेत यावी.
– 9. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, मार्केट आणि औद्यौगिक व व्यावसायिक आस्थापनामध्ये कामाच्या तासाचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घेणेत यावी.
–10. कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडणेच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हॅड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे.
– 11. कामाच्या ठिकाणीअसलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निर्जंतुकीकरण करणेत यावे.
–12. कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळला जावा.
– केश कर्तनालय व स्पा साठी सशर्त परवानगी
– सद्यपरिपीस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणेकरीत त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. व ज्याअर्धा, कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन आदेशाची मुदत दिनांक 31/5/2020 रोजी रात्री 12.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
– लॉकडाऊन कालावधीत कोल्हापूर जिल्यातील सर्व केश कर्तनालयात व स्पा मध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याच्या अटीवर सुरु ठेवण्याचे आदेश
– 1) आस्थापन सुरु करताना पूर्णतः निजर्तुंकीकरण करण्याची आहे. (1 टक्के सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करुन)
– 2) वापरण्यात येणारी सर्व उपकरणे व तत्सम साहित्य हे प्रत्येक वेळी वापरताना निजर्तुंकीकरण करण्याचे आहे.
— 3) एका वेळेस दोन खुर्च्यांमध्ये किमान 3 फुटांचे अंतर ठेवून खुर्च्यांची व्यवस्था करणे बंधनकारक
– 4) चालक/मालक/कामगाराने मास्क वापरणे व हँन्ड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक
– 5) चालक, मालक, कामगाराने स्वतःचे हात वारंवार साबणाने धुणे, स्वच्छ करणे
– 6) चालक, मालक, कामगाराने मास्क वापरणे बंधनकारक.
– 7) आस्थापनेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने मास्क वापरणे बंधनकारक.
– 8) वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकीन व तत्सम साहित्य हे एकदा वापरल्यावर त्याचा वापर दुसऱ्या ग्राहकास करता येणार नाही. यासाठी असे साहित्य फक्त एकदा वापरुन नष्ट करता येणार असलेले साहित्य वापरणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक.
– 9) आस्थापनेत समाजिक अंतर ठेवून प्रतिक्षा कक्षाची स्वतंत्र सेवा नसल्यास ग्राहकांना थांबवून घेता येणार नाही. यासाठी सर्व आस्थापनांनी ते देत असलेल्या सेवेसाठी दिवस व वेळ निहाय आगाऊ आरक्षण करूनच ग्राहक बोलवावेत.
– 10) सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 अखेर सुरु ठेवण्याचे आहे. आस्थापना मालक, चालक, कामगार व ग्राहक यांनी सामाजिक अंतर (Social Distance) व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आहे.
– 11) चालक/मालक/कामगार यांनी ग्राहकांना तसेच दुकानात येणा-या सर्व घटकांना हात धुण्यासाठी पाण्याची सोय वापरण्याकरीता सॅनिटायझर, साबण इत्याची उपलब्धता करून देण्याचे आहे.
– 12)चालक, मालक, कामगारांने आस्थापनेत आलेल्या दोन व्यक्तींनी बसताना दोघामध्ये कमीत कमी तीन फुटाचे अंतर (Social Divince) राहील याची दक्षता घ्यावी.
-13) सर्दी, ताप, खोकला असणा-या व्यक्तींना आस्थापनेत येण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
– उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द कारवाई करण्याचे व गुन्हे दाखल करून अशा आस्थापना बंद करण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तालुका दंडाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी संबधीत स्थानिक प्राधिकरणाच्या आयुक्त किंवा मुख्य अधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी किंवा सचिवास प्रदान करण्यात येत आहे, असेही यात म्हटले आहे.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.