रमजान ईद खर्चास फाटा देत स्वच्छता व आरोग्य कर्मचारी यांचा कपडे व जीवनावश्यक वस्तू देऊन सत्कार
– कोडोली (प्रतिनिधी) रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी न करता खर्चास फाटा देत कोडोलीतील चावडी भागातील मुस्लिम समाज(आंबी वाडा) यांच्याकडून कोडोलीतील ग्रामपंचायत मध्ये काम करणारे स्वच्छता व आरोग्य कर्मचारी यांचा धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना सारख्या असाध्य रोगाच्या लॉकडाऊन काळात कोडोलीची स्वच्छता ठेवणेत ग्रामपंचायत मध्ये काम करणारे चतुर्थ श्रेणीतील स्वच्छता व आरोग्य कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. रमजान ईद काळात कपडे, जेवण यावर मोठया प्रमाणात खर्च होत असतो देशात कोरोना मुळे रमजान ईद घरातच करण्याचे ठरवून या ईद दिवशी होणाऱ्या खर्चास फाटा देत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून कोडोलीतील चावडी भाग येथील आंबीवाडा मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार व जीवनावश्यक भेट वस्तू देऊन रमजान ईद साजरी केली.
– यावेळी कोतवाल सिराज आंबी, ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, नाभिक समाज अध्यक्ष विवेक रोकडे, असिफ आंबी, अरबाज आंबी, कासीम आंबी,मारुती माळी, संजय राबाडे, धनाजी राबडे, बरकत आंबी यांच्या सह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
रमजान ईद खर्चास फाटा देत स्वच्छता व आरोग्य कर्मचारी यांचा कपडे व जीवनावश्यक वस्तू देऊन सत्कार
102
previous post