इंटरनॅशनल ‘स्पीड न्यूज’ वेब चॅनेलचा कोल्हापुरात शुभारंभ
– कोल्हापूर (प्रतिनिधी)इंटरनॅशनल ‘स्पीड न्यूज’ लाईव्ह २४ वेब पोर्टल चॅनेलचा आज कोल्हापुरात शुभारंभ करण्यात आला. सामाजिक अंतर ठेवत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पत्रकारांनी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देवून ‘स्पीड न्यूज’ परिवारास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांना मास्क देवून ‘स्पीड न्यूज’ परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली. हे चॅनेल लवकरचं टिव्ही चॅनेलवर झळकणार असल्याचे चॅनेलच्या व्यवस्थापकीय संचालिका अॅड. कल्पिता कुंभार आणि कार्यकारी संपादक सागर पाटील यांनी यावेळी जाहिर केले. त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक संजय कुंभार, ज्येष्ठ पत्रकार सुहास पाटील यांनी उपस्थित मान्यरांचे स्वागत केले.
– सोशल मिडीया हा अविभाज्य घटक झाला आहे. त्याची व्याप्ती जागतीक पातळीवर असल्याने क्षणात घडलेल्या सर्व क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर लोकांपर्यंत पोहचत आहेत. अशा सोशल मिडीयातील इंटरनॅशनल ‘स्पीड न्यूज’चा शुभारंभ आज, रविवारी २४ मे रोजी कोल्हापुरात पार पडला. अल्फावधीत प्रत्येक व्यक्तिच्या मनामध्ये स्थान निर्माण केलेल्या ‘स्पीड न्यूज’ला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ‘स्पीड न्यूज’च्या कार्यालयाची रचना आणि न्यूजची मांडणी पाहून कौतुक केले. सामाजिक अंतर ठेवून हा सोहळा पार पडला. यावेळी प्रत्येक मान्यवरांना मास्क भेट देवून ‘स्पीड न्यूज’ने सामाजिक बांधिलकी जपली. काही मान्यवरांनी फोन, वॉटसअॅप, फेसबुक, इंस्ट्राग्रामवरुनही शुभेच्छा दिल्या.
– कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक हाजी अब्दुलहमीद मीरशिकारी , ‘वारणेचा वाघ’ चे संपादक व प्रसिद्ध उद्योजक प्रविण पाटील , बी. ए.जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
80