कोल्हापूर

ऑटो रिक्षा टॅक्सी होणार नाहीत स्क्रॅप; वर्षाची मुदत वाढ – डॉ. स्टीव्हन अल्वारिस

by संपादक

ऑटो रिक्षा टॅक्सी होणार नाहीत स्क्रॅप; वर्षाची मुदत वाढ – डॉ. स्टीव्हन अल्वारिस
– कोल्हापूर (प्रतिनिधी) पेट्रोल-डिझेल ऑटोरिक्षा १६ वर्षे, एलपीजी ऑटोरिक्षा १८ वर्षे व टॅक्सी २०वर्षे अशी वयोमर्यादा यापूर्वी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने निश्चित केली होती. त्यानुसार ही मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली होती. त्यामुळे ही वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. या वाहनांना १ वर्षाची म्हणजे ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
– राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने यापूर्वी निश्चित केलेल्या वयोमर्यादे नुसार २८२३ पेट्रोलच्या, ३९६ डिझेलच्या, २१२८ एलपीजीच्या रिक्षा अशा एकूण ५३४७ ऑटो रिक्षा त्याचप्रमाणे १३ पेट्रोल टॅक्सी, ११२ डिझेल टॅक्सी, ६१ एलपीजी टॅक्सी अशा एकूण १८० टॅक्सींची वयोमर्यादा ३१ मार्च २०२० ला संपल्यामुळे सर्वांना वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. बऱ्याच ऑटोरिक्षा संघटनांनी याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.
– कोरोना पार्श्वभूमीवर ऑटो चालकांवर ओढवलेले संकट पाहता ऑटो रिक्षा स्क्रॅप करून दुसरे मोठे संकट त्यांच्यावर ओढवणार होते. जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आता ही मर्यादा ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

You may also like

Leave a Comment