कोल्हापूर

पन्हाळा कोरोना केअर सेंटरला कोडोलीतून मदत

by संपादक

पन्हाळा कोरोना केअर सेंटरला कोडोलीतून दीड लाखाची मदत
– कोडोली (प्रतिनिधी) पन्हाळा तालुक्यांमध्ये एकलव्य पब्लिक स्कूल पन्हाळा याठिकाणी कोरोना केअर सेंटर उभा केले आहे. या केअर सेंटरला कोडोली येथील सहकारी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून पी पी इ किट १७०,एन ९५ मास्क ३००, ट्रिपल लेअर मास्क ‌२००० असे एकूण दीड लाख रुपयांचे साहित्य व हॉस्पिटल बेड अशी भरीव स्वरूपाची मदत करण्यात आली .सदर साहित्य उपविभागीय अधिकारी अमित माळी व पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कोडोली येथे स्वीकारले.
– कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टर नर्सेस यांना विविध किट्स ची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे .याकरिता कोडोली मंडल कार्यालयाच्यावतीने कोडोलीतील सहकारी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यामध्ये कोडोली नागरी पतसंस्था ४५०००, सिद्धेश्वर पतसंस्था २५०००, इंडियन कॅनेडियन प्रेसबीटेरियन मिशन कोडोली २०००० ,बालाजी उद्योग समूह १०००, विघ्नहर्ता उद्योग समूह ११०००, महेंद्र देशमुख ५०००, उमेश बुड्ढे ५०००, फाइन वाइन ८०००, मिलिंद कोडगुले २०००, शेतकरी मेडिकल १०००, रमाकांत देशमुख१०००, अजय देशमुख ५०० यांच्यासह यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय यांचेकडून २० हॉस्पिटल बेड देण्यात आले.
– या कार्यक्रमाप्रसंगी माजी जि. प .सदस्य अमरसिंह पाटील, सरपंच शंकर पाटील ,माजी सरपंच नितीन कापरे, कोडोली नागरी पतसंस्थेचे चेअरमन धिरज पाटील,व्हा. चेअरमन पी .डी. पाटील, कोडोली चे मंडलधिकारी अभिजित पवार ,तलाठी अनिल पवार यांच्यासह विविध संस्थांचे चेअरमन ,संचालक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment