कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. प्रकाश चिकुर्डेकर

by संपादक

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. प्रकाश चिकुर्डेकर
– कोडोली(प्रतिनिधी)वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांची नियुक्ती झाली .श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे , प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी पद जेष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारावरती नियुक्ती केली आहे.
– शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रा बाहेर महाविद्यालय स्तरावर हिंदीचे पहिले प्रोफेसर होण्याचा सन्मान त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये मिळविला. गेली ३५ वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून प्राथमिक शिक्षक म्हणून शांतिनिकेतन सांगली येथे यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. नोकरी बरोबर उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन सर्वोच्च गुणावर त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या. गेल्या २९ वर्षा पासून ते महाविद्यालयात हिंदी विभागाकडे कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर ते सध्या सदस्य म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सदस्यपदी ही कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी विशेष कार्य केले असून दैनिक “सकाळ”, कडे बारा वर्षाच्या हून अधिक काळ बातमीदार म्हणून कार्यरत होते .
– त्याचबरोबर हिंदी भाषेतील संशोधनाचा सर्वश्रेष्ठ अमन सिंह आत्रेय पुरस्कार २००३ साली प्राप्त झाला आहे. याच बरोबर विविध सामाजिक, शैक्षणिक, संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ७५ हून अधिक, हिंदी भाषेतील शोधनिबंध लिहून ते देश-विदेशातील मासिकातून संदर्भ ग्रंथातून प्रकाशित झाले आहेत. तीन संशोधनात्मक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले असून अन्य २० कोण अधिक संदर्भग्रंथांची सहाय्यक लेखक म्हणून ते प्रकाशित झाले आहेत. याशिवाय मराठी हिंदी भाषेत लेख, कथा, कविता, मुलाखती च्या माध्यमातून विपूल लेखन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा विद्यार्थ्यांनी एम.फिल. पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या असून अन्य पाच विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले असून एक उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. नुकतेच त्यांनी लोक डाऊन काळात हिंदी भाषेतून समाज जनजागरण या हेतूने करोना कोव्हीड-१९ ऑनलाइन सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली होती त्याला जगभरातून प्रतिसाद मिळून तीन हजारहून अधिक लोकांनी प्रतिसाद देऊन गौरव केला आहे.
-नियुक्ती बद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले असून अपार कष्ट, परिवार आणि गुरुजनांचे आशीर्वाद, कामातील सातत्य, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेतून कामाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचता आल्याचे ते म्हणाले. महाविद्यालय स्तरावर काम करताना अनेक आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी अपार कष्ट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे या गावचे आहेत.

You may also like

Leave a Comment