कोल्हापूर

कोडोलीतील प्रेसबिटेरियन मिशनच्या जागेवर अधिकार नसलेल्या व्यक्तींचे अपील

by संपादक

कोडोलीतील प्रेसबिटेरियन मिशनच्या जागेवर अधिकार नसलेल्या व्यक्तींचे अपील ……………………………….
– दबावतंत्राने रिकाम्या जागा हडपण्यासाठी प्रयत्न : गायकवाड
– वारणानगर ( प्रतिनिधी )कोडोलीतील दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनच्या जागेवर अधिकार नसलेल्या व्यक्तींचे अपील बेकायदेशीर असून दबावतंत्राने रिकाम्या जागा हडपण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न असल्याची माहिती दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दिपक गायकवाड यानी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
– दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनच्या कोडोलीतील जागेबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयात सन २०१९ मध्ये कमिशन ऑन इक्यूमिनीकल मिशनचे प्रशासक म्हणून बिशप बथुवेल रामचंद्र तिवडे पाळक व कोल्हापूर चर्च कौसिलचे सचिव रेव्हरंड जे.ए. हिरवे यानी दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनच्या वटमुखत्यार अधिकार असलेले दिपक गायकवाड, दिलीप लोंढे यांच्या विरोधात अपिल दाखल केले आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी अनेक प्रकरणे यापूर्वीची प्रलंबीत आहेत.देशात लॉक डाऊन असल्याने देशात महसूली सह सर्वच प्रकारची न्याय प्रविष्ठ कामे बंद असताना तसेच वादी व प्रतिवादी यांनी अपिलातील काम चालवणेबाबत कोणताही आग्रह अथवा अर्ज सादर केला नसताना जिल्हयात एकमेव सदरचे अपिल प्रभारी अप्पर दंडाधिकारी यांनी दि. ४ रोजी तदनतंर लगेचच मंगळवार दि. ९ रोजी सुनावनीस घेतले आहे या संदर्भाने दिपक गायकवाड यानी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली.
– कमिशन ऑन इक्यूमिनीकल मिशनचे प्रशासक म्हणून बिशप बथुवेल रामचंद्र तिवडे पाळक यांचा कार्यकाल संपून अनेक वर्ष झाले आहेत तर कोल्हापूर चर्च कौसिलचे सचिव रेव्हरंड जे.ए. हिरवे यांना अपिलास कोणताही अधिकार नाही असे असताना देखील अधिकार नसलेल्या व्यक्तींचे अपील दाखल करून घेणे लोकशाही व न्याय व्यवस्थेवरचा हा अघात आहे असा न्याय व्यवस्थेवर अघात होऊ नये असे दिपक गायकवाड यांनी सांगुन ज्यांना अधिकार आहे ज्याच्याकडे स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आहेत अशा व्यक्तीनी अपील करावे त्यांचा तो नैसर्गिक अधिकार आहे तथापी अधिकार नसलेल्या लोकानी अपील दाखल करून दिशाभूल व दबावतंत्राने मिशनच्या जागा ताब्यात घेण्यासाठी चालवलेला प्रयत्न असल्याचे सांगीतले.
– दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशन इंदोर व डेहराडून यांच्या तर्फे शाळा, हॉस्पीटल या सह पायाभूत सुविधासाठी देशातील अनेक शहरात व गांवात जागा आहेत त्याप्रमाणे त्या महाराष्ट्रात देखील आहेत मिरज,सांगली, कोल्हापूर तसेच कोडोली, पन्हाळा येथे देखील मोठ्या प्रमाणात जागा आहेत या सर्व जागेचा शासनाचा अकृषीक करासह इतर कर देखील मिशन भरत आहे त्यामुळे या सर्व जागावर इतर कोणाचाही अधिकार नसल्याचे दिपक गायकवाड यानी सांगीतले.
– मिशनच्या जागे संदर्भात पन्हाळा दंडाधिकारी तथा तहसिलदार पासून सर्व वरिष्ठ दंडाधिकारी यांच्या पर्यन्त तसेच पन्हाळा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यन्त दाखल केलेले अपील फेटाळण्यात येवून सदर जागेच्या मालकी दि. इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनच्या मालकीच्या असल्याचे न्यायालयाने निकाल दिले आहेत या जागेबाबत कोणाला अधिकार आहेत हे देखील निश्चित केले आहे असे सर्वोच्च न्यायालयापर्यन्तचे सर्व निकाल मिशनकडे उपलब्द आहेत तरी देखील पुन्हा अप्पर जिल्हादंडाधिकारी यांचेकडे अधिकार नसलेल्या व्यक्ती अपील दाखल करतात व त्याप्रमाणे सुनावनी सुरू होते हा केवळ अपिल कर्त्याचा त्रास देण्याचा उद्योग असल्याचे दिपक गायकवाड यांनी सांगीतले.

You may also like

Leave a Comment