‘आरोग्य सेतू’ च्या माहितीमुळे संपर्कातील ५९६ जणांना दक्षतेचे संदेश- जिल्हाधिकारी दौलत देसाई
– कोल्हापूर(प्रतिनिधी)आरोग्य सेतू या ॲपमुळे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५९६ जणांची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे संदेश संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
– आरोग्य सेतू हे भारत सरकारद्वारे विकसित डिजिटल सेवा पुरवणारे मोबाईल ॲप आहे. कोव्हिड-19 संक्रमणाच्या संभाव्य जोखिमेबाबत कळविणे आणि निरोगी राहण्यासाठी अंमलात आणण्याच्या सर्वोत्तम पध्दती तसेच कोव्हिड-19 महामारीशी संबंधित लागू व निवडक वैद्यकीय ॲडव्हायझरी पुरविण्याचा यात समावेश आहे. आरोग्य सेतू हे सामान्य कृती करत असताना ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला आसाल त्या सर्वांचा तपशील रेकॉर्ड करण्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वापरते आणि जर त्यापैकी कोणाचेही नंतर कोव्हिड-19 पॉझिटिव्ह म्हणून निदान झाल्यास कळविले जाते.
– या ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याची स्थिती, माध्यम विभागात विविध चित्रीकरणातून जनजागृती बद्दल माहिती दिली जात आहे. यामधून शिक्षित करण्यात येत आहे. कोव्हिड-19 बाबत राज्य निहाय अद्ययावत माहितीही दिली जात आहे. ई पास बाबतही माहिती मिळत आहे.
-१२ कोटी ५८ लाख भारतीय हे ॲप वापरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३ लाख ६ हजार ८६९ जण हे ॲप वापरत आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३६ रुग्णांकडे ॲपचा वापर होत आहे. १ लाख २३ हजार ९५० व्यक्तींनी या ॲपच्या माध्यमातून स्वत:ची माहिती अपडेट केली आहे.
– एखाद्या व्यक्तीचे कोव्हिड पाॕझिटिव्ह निदान झाले असेल तर चाचणी प्रयोगशाळा ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर) कोव्हिड-19 चाचणीसाठी मध्यतर्वी सरकारी संस्था यांच्याकडे शेअर करते. आयसीएमआर, ॲप्लीकेशन प्रोग्राम इंटरफेसमार्फत कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तींची यादी आरोग्य सेतू सर्व्हरवर शेअर करते. जर कोव्हिड 19 निदान झालेल्या व्यक्तीकडे आरोग्य सेतू ॲप इंस्टॉल केलेले असेल तर सर्व्हर ॲप स्टेटस अपडेट करते आणि या व्यक्तीसाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु करते.
– पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील ५९६ जणांची माहिती या ब्ल्यू टूथ कनेक्शनच्या माध्यमातून या ॲपमुळे मिळाली. या ५९६ जणांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य काळजी घेण्याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.
137