कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर जिल्ह्यातील ॲड. दिलशाद मुजावर आणि मयुरी आळवेकर

by संपादक

महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर जिल्ह्यातील ॲड. दिलशाद मुजावर आणि मयुरी आळवेकर
– कोल्हापूर (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर जिल्ह्यातील ॲड. दिलशाद मुजावर आणि मयुरी आळवेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
– राज्यातील तृतीयपंथीय यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळ स्थापन करण्यास १३ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयाद्वारे विहीत केलेल्या मंडळाच्या संरचनेनुसार राज्यस्तरावरील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर पुढील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे.
– मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – अध्यक्ष, राज्यमंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- सह अध्यक्ष, सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – उपाध्यक्ष, सलमा खान, लोक अदालत पॅनलिस्ट, बांद्रा ओल्ड कोर्ट व अध्यक्ष, किन्नरमाँ एक सामाजिक संस्था – सह उपाध्यक्ष, विधानसभा सदस्य (1), विद्या चव्हाण आमदार विधान परिषद सदस्य, ॲड. दिलशाद मुजावर, डॉ. शुभांगी पारकर, डीन केईएम (वैद्यकीय), वर्षा विद्या विलास (सामाजिक कार्य),गौरी सावंत, चांदनी शेख, अध्यक्ष त्रिवेणी संस्था (ट्रान्सवुमेन), ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, कामगार, कौशल्य विकास, वित्त, नियोजन, विधी व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, गृह, गृहनिर्माण आणि महसूल व वन विभागाचे सह अथवा उपसचिव, महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. आंबेडकर समता प्रतिष्ठा नागपूर, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स कन्ट्रोल सोसायटी,प्रिया पाटील, प्रवित्रा निंभोरकर, राणी ढवळे, चिमा गुरू, दिशा पिंकी शेख, मयुरी आळवेकर हे सर्व सदस्य आहेत. तर, आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव व समन्वयक आहेत.

You may also like

Leave a Comment