डॉ. अशोकराव माने यांचे कडून कोवीड योद्यानां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

by Admin

डॉ. अशोकराव माने यांचे कडून कोवीड योद्यानां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
– कोडोली (प्रतिनिधी) पाडळी ता. हातकणंगले येथील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स ,ग्रामपंचायत कर्मचारी व नाभिक व्यवसायिक यांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप जनसुराज्य शक्ती पक्षाचे जि. प. सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांचेकडून करण्यात आले.
– यावेळी राजेश पाटील म्हणाले कोरोना महामारी संकटात अशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका अतिशय चांगले काम करत असल्याने या भागात या विषाणूचा फैलाव झालेला नाही असे सांगून वरील सर्वांचा सत्कार केला. यावेळी हातकणंगले हातकणंगले तालुका भाजपा अध्यक्ष राजेश पाटील, डॉ.अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, राजेंद्र मुळीक, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, प्रकाश पाटील, वसंत मुळीक, डॉ. विभा पाटील, डॉ. दीपक पाटील, अमर पाटील ,कृष्णात गायकवाड ,युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश खोंद्रे, कांचन कारंडे, शिवाजी पाटील, स्वप्नील पवार यांच्यासह जनसुराज्य व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment