कोल्हापूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मसाई पठार चहाची मळी परिसरात अभिवादन

by संपादक

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मसाई पठार चहाची मळी परिसरात अभिवादन
– पन्हाळा (प्रतिनिधी)लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६व्या जयंती निमित्त मसाई पठार परिसरातील शाहुकालीन चहाची मळी परिसरात अभिवादन करण्यात आले. प्रतिवर्षी बांधारी मित्र फौंडेशन आणि ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने शाहूकालीन चहाची मळी येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते.
– शाहू महाराज यांनी पुर्वोत्तर राज्यांच्या दौर्यावर असताना त्यांना तेथील चहाचे मळे पाहून अशा प्रकारचे चहाचे उत्पादन आपल्या संस्थानात घेता येईल या उद्देशाने मसाई पठार परिसरात या जागेची निवड करून यशस्वी चहाची लागवड केली होती.आपल्या संस्थानाची गरज भागवून शिल्लक चहा ‘पन्हाळा फोर्ट टी’ या नावाने इंग्लंडला निर्यात करण्यात येत असे.तत्कालीन गॅझेटमध्ये याचे संदर्भ सापडतात.स्वातंत्र्योत्तर काळात चहाचे मळे अस्तित्वात नसले तरी शाहू महाराज यांच्या या कार्यास अभिवादन करण्यासाठी बांधारी मित्र फौंडेशनआणि ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू कालीन चहाची मळी परिसरात जयंती साजरी करण्यात येते.
– यावेळी जेऊरचे सरपंच उत्तम महाडीक यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले तर भगतसिंग सहकार समुहाचे अध्यक्ष भीमराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बांधारी मित्र फौंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय बोबडे,मसाई अॅडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष जयेश खेतल, संघर्ष बहूजन सेनेचे राज्य निरिक्षक सिद्धार्थ वाघमारे,शिवाजीराव गिरीगोसावी, कृष्णात भारमल, विनोद साठे,प्रसाद पाटील यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment