कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “पन्हाळा ते पावनखिंड” ऐतिहासिक मोहीम स्थगित.
– पन्हाळा( प्रतिनिधी) हिल रायडर्स अॅडव्हेंचर फौंडेशन कोल्हापूर यांचे वतीने प्रतिवर्षी “पन्हाळा ते पावनखिंड “या मोहिमेचे आयोजन केले जाते. पण यावर्षी कोरोना च्या महामारी संकटामुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे .गेल्या पस्तीस वर्षात पहिल्यांदाच ही मोहीम स्थगित झाली आहे.
– प्रतिवर्षी आयोजित होत असलेल्या या मोहिमेत महाराष्ट्र बरोबरच गोवा, कर्नाटक ,आंध्र गुजरात आदी राज्यातून शिवभक्त, निसर्गप्रेमी ट्रेकर्स मंडळी सहभागी होतात .मोहिमेच्या सुरुवातीला शेकडो लोकांच्या सहभागाने ही मोहीम होत होती .पण अलीकडे या मोहिमेमध्ये हजारो शिवभक्त सहभागी होऊ लागल्याने गेली दहा वर्षे प्रतिवर्षी तीन मोहिमेंचे आयोजन केले जात आहे. पण या वर्षी मार्चपासून कोरोना या विषाणूने थैमान घातल्यामुळे अनेक ट्रेकर्स मंडळींना सर्वांबरोबर घरात कोंडून घेऊन राहावे लागले. असे असताना देखील सर्व ट्रेकर्स शिवभक्त मंडळींनी या दिवसात वेगवेगळ्या प्रकाराने शिवभक्तिचा व दुर्ग प्रेमाचा जागर केला.
– सध्या लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाला आहे. आता अनेक जण अनावर ओढीने किल्ल्यांकडे धावत सुटतील काही पावसाळी मोहीमांकडे धावतील नेमकं हेच सर्वांनी टाळलं पाहिजे. कारण महामारीचा धोका अजून संपलेला नाही, उलट मोठ्या शहरांमधून तो आता आवाक्याच्या बाहेर गेला आहे.ही महामारी थोपवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अगदी गाव पातळीवर सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीसदल ही सर्व मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, असे असताना प्रतिवर्षी प्रमाणे आपण आपल्या मोहिमा आखू लागलो तर काही वाड्या-वस्त्या यापासून अलीप्त आहोत.आपल्या अतिउत्साहाच्या भरात या ठिकाणी पोहोचलो तर कदाचित हि मंडळी संसर्गात येतील किंवा आपल्या सहभागींना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याची कल्पना ही आपण करू शकत नाही.हिल रायडर्स च्या ग्रुप सदस्यांनी यांना मदत द्यायला गेल्यावर येथील परिस्थिती पाहिली आहे.
– “पन्हाळा ते पावनखिंड” या ऐतिहासिक मोहिमेचा मार्ग पन्हाळा व शाहूवाडी या दोन्ही तालुक्यामधून जातो. या मोहिमेची सुरुवात पन्हाळा तालुक्यातून होते तर सांगता शाहूवाडी तालुक्यात होते .या मोहिमेचा जास्तीत जास्त ७५ टक्के मार्ग शाहूवाडी तालुक्यातून जातो आणि आपल्यांना माहित आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त शाहूवाडी तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव आहे.या मोहीम मार्गावरील बऱ्याच वाड्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या परिस्थतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या शाहूवाडीतील वाड्या-वस्त्यांचा विचार करता या सर्वांचे आरोग्य सुखरूप राहावे हा उद्दात्त हेतू समोर ठेऊनच हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनने या वर्षाची “पन्हाळा ते पावनखिंड” ही ऐतीहासीक मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेत आहे.
122