राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत – जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील

by Admin

राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत – जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
– असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेची मागणी
– कोडोली( प्रतिनिधी) वाढती महागाई आणि घटते उत्पन्न साधन यामुळे पत्रकारांचा प्रपंच अडचणीत आला आहे. पैशाचे सोंग आणता येत नाही आणि घेतलेला वसा टाकता ही येत नाही अशी अवस्था पत्रकारांची झाली असून पंतप्रधानांच्या अनेक योजनांमध्ये प्रत्येकाला स्वतःचे घर अशी एक योजना आहे याच धर्तीवर राज्य सरकारनेही पत्रकारांसाठी घरांची योजना अमलात आणावी अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व राज्य सचिव प्रवीण पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
– अनेक पत्रकारांची उपजीविका आज केवळ आणि केवळ पत्रकारितेवर अवलंबित आहे. तरीही प्रसंगी स्वतः बरोबर कुटुंबाच्या पोटाला चिमटा देत पत्रकारितेचे वृत्त जपलं जात असल्याचे दिसून येत आहे. पत्रकारितेतून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावरच वाढत्या गरजा भागवत प्रसंगी कर्जबाजारी होत आहेत पण पत्रकारिता करीत आहेत. अशा पत्रकारा करिता पूर्वीच्या म्हाडा योजनेचे पुनरुजीवन करून ती सुरू केली तर छोट्या-मोठ्या पत्रकारांना त्याचा लाभ मिळू शकेल अशी योजना सवलतीची आणि किमान अटी नियमांची असावी त्यामध्ये प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनाही लाभ घेता येईल असेही निवेदनात म्हटले आहे.

You may also like

Leave a Comment