यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात शिक्षक मी… कलावंत मी… उपक्रम

by Admin

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात शिक्षक मी… कलावंत मी… उपक्रम
– वारणानगर (प्रतिनिधी)येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या साठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी संयोजन केले.
– महाविद्यालयातील प्राध्यापकांच्यासाठी डॉ. एस. एस. खोत यांनी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रभावी अध्यापनासाठी “शिक्षक शैक्षणिक विकास आणि अध्ययन अध्यापन या पाच दिवस ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या बरोबर देशभरातून सत्तरहून अधिक विविध संस्थातील प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. प्रा. विठ्ठल सावंत, डॉ. प्रीती शिंदे पाटील आणि सहकारी प्राध्यापकांनीबनविलेल्या “शिक्षक मी कलावंत मी”या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी रेखाटलेली चित्रे, छायाचित्रे, भित्तीचित्रे याचे प्रकाशन डॉ.वासंती रासम यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्यावतीने सामाजिक जाणीव उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील दोनशे कर्मचाऱ्यांना मास्क चे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने शिवनेरी क्रीडांगणावरील डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, डॉ. सी. आर. जाधव, प्रा. आर. पी. कावणे,प्रा. अण्णा पाटील, प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण ही संपन्न झाले.
– महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी ऑनलाइन टिचिंग सुरू केले असून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा विशेष लाभ होत आहे. अध्ययन-अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यूट्यूब लेक्चर, व्हिडीओ लेक्चर प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रिया संदर्भात डॉ. संतोष जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ८० हून अधिक प्राध्यापकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करून प्रतिसाद दिला.
– कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता येण्यासाठी अकाउंट विभागाचे महत्व ओळखून महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी गुणवत्ता विकास उपक्रम राबवण्यात आला. पाच दिवस दैनंदिन कामकाज सांभाळून चाललेल्या या उपक्रमात ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने “कार्यालयीन आर्थिक व्यवहार, लेखन, कार्य आणि पद्धती” या विषयावरचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर , भालचंद्र शेटे आणि दिलीप पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी कोरोना काळातील कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले.

You may also like

Leave a Comment