कोल्हापूर

वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे

by संपादक

ऑनलाईन प्रशिक्षण ही काळाची काळाची गरज : डॉ. वासंती रासम
– वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे – वारणानगर (प्रतिनिधी) सध्या कोरोना (Covid-19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्याला शैक्षणिक क्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाज पूर्णपणे बंद झालेले आहे आणि वेगवेगळी नव-नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.
– कोरोना संसर्गाचा परिणाम होऊन प्राथमिक, माध्यमिक उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत असताना श्री वारणा शिक्षण मंडळ वारणानगर यांचेमार्फत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.सर्व स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसायिक शिक्षण यामधील शिक्षकांच्या करिता ऑनलाईन प्रशिक्षण कसे करावे याबाबत बऱ्याच दिवसापासून मागणी होत होती या मागणीचा विचार करून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ चे प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण ही काळाची गरज ओळखून व त्याचबरोबर जागतिक कोरोना महामारीत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकरिता ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे याची एक दिवसीय कार्यशाळा सोमवार दिनांक १३ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केलेली आहे तरी सर्व इच्छुक शिक्षक प्राध्यापकाने या कार्यशाळेसाठी इच्छुक शिक्षक प्राध्यापकानी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी या लिंकचा वापर करावा’ tkietwarana.ac.in/webinar2020 अधिक माहितीसाठी ९९२२२८८६७८, ९९७५४१९४८३ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.
– या कार्यशाळेमध्ये गुगल मीट गूगल क्लासरूम याचा वापर प्रभावीपणे कसा करावा व इतर ऑनलाईन पद्धती कशा वापराव्यात याबद्दलचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉ. रासम यांनी पत्रकार परिषदेत दिली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच डॉ. एस. व्ही. आनेकर प्राचार्य अभियांत्रिकी, प्रा. बी. व्ही. बिराजदार प्राचार्य पॉलिटेक्निक यांचे मार्गदर्शन मिळत आहे. प्रा. आर बी पाटील, प्रा. पल्लवी बावणे- पाटील व एन. बी. जाधव हे या कार्यशाळेकरीता मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

You may also like

4 comments

Dipak chavan जुलै 9, 2020 - 10:55 pm

Warananagar

Reply
ANIL PATIL जुलै 10, 2020 - 5:36 pm

To
Dr. Vasnti Rasam
Administrative Head.
Warana Educational Cenetre

Respected Madam
It is relevant and excellent exercise undertsken by your Institute under your guidance. We will take benefit of the same.
Thanks
Dr. Anil Patil Gandhinglaj

Reply
ANIL PATIL जुलै 10, 2020 - 5:38 pm

Excellent job

Reply
Dr. Sanjay Sagaru Sapkal जुलै 13, 2020 - 2:24 pm

I am interested

Reply

Leave a Comment