कोल्हापूर

कोरोना अस्वस्थ रुग्णांकरिता बेड उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्षातील क्रमांकावर संपर्क साधावा – पालकमंत्री

by संपादक

कोरोना अस्वस्थ रुग्णांकरिता बेड उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्षातील क्रमांकावर संपर्क साधाव-पालकमंत्री सतेज पाटील
– कोल्हापूर (प्रतिनिधी) अस्वस्थ रुग्णांना रुग्णालयातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती आणि बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना नियंत्रण कक्षामधील 9356716563, 9356732728, 9356713330 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
– पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यात प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. आपण मोठ्या प्रमाणात तपासणी करत असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. कमी लक्षणं किंवा लक्षणं नसणाऱ्यांवर घरामध्ये उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट शिरोली या ट्रस्टने पुढाकार घेवून सोमवारपासून अशांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. वडणगे ग्रामपंचातीने निर्णय घेतला आहे. गावातील 10, 15 डॉक्टर्स एकत्र येवून जे सौम्य लक्षणं असणारे तसेच लक्षणं नसणाऱ्यांवर उपचार करणार आहेत. अशा पध्दतीने काही गावांनी, संस्थांनी पुढे येवून उपचार केल्यास प्रशासनास मदत होणार आहे.
– बेड वाढविण्यासाठी प्रशासन तत्पर-
– अस्वस्थ रुग्णासाठी खाटांची संख्या वाढविण्याचं काम प्रशासन तत्परतेने करत आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय, अथायू रुग्णालय, डायमंड, ॲपल, स्वस्तिक, सनराईज अशा अनेक रुग्णालयात अस्वस्थ रुग्णांसाठी प्रामुख्यानं सोय केली आहे. व्हेंटिलेटर्सची सुविधाही करतोय. सीपीआरमध्ये 42 व्हेंटिलेटर्स आहेत. आणखी 20 व्हेंटिलेटर्स पुढच्या दोन दिवसात बसणार आहेत.
– बेड मिळत नाही अशी जी तक्रार येते त्यासाठी 24×7 तास तीन हेल्पलाईन कार्यरत करतोय. तीन अधिकारी या मोबाईल क्रमांकासाठी उपलब्ध असणार आहेत. बेडची कमतरता वाटली, नेमकी गरज काय आहे. यासाठी 9356716563, 9356732728, 9356713330 या तीन क्रमांकावर संपर्क करावा, या क्रमांकावर मदत मिळेल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न जिल्ह्यानं केला आहे. प्रशासन आपल्या पध्दतीने हे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

You may also like

Leave a Comment