वारणेचा वाघ फौंडेशन’ने जपली सामाजिक बांधिलकी
कोडोली (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून कोडोली गावात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे .मंगळवार दि. ०४ ऑगस्ट रोजी सकाळी कोडोली येथील एक संशयित रुग्ण पन्हाळा येथील एकलव्य कोविड सेंटरमध्ये दाखल केला होता. सदर रुग्णाचा स्वॅब घेऊन तो तपासणीकरिता पाठविला परंतु या दरम्यान संशयित रुग्णाचा एकलव्य कोविड सेंटर याठिकाणी मृत्यू झाला. हा रुग्ण संशयित असल्याने त्याचा मृतदेह अंत्यविधी करिता कोडोली येथे न आणता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी करिता नेण्याचा निर्णय कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. परंतु एकलव्य कोविड सेंटर येथून कोल्हापूर या ठिकाणी मृतदेह नेण्याकरिता सकाळ पासून सायंकाळी चार पर्यंत कोणतीही रुग्णवाहिका अथवा इतर वाहन उपलब्ध झाले नाही. त्यानंतर कोडोली ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने वारणेचा वाघ फौंडेशनचे अध्यक्ष श्री प्रविण पाटील यांच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवून द्यावी अशी विनंती केली. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वारणेचा वाघ फौंडेशन कोणताही विचार न करता चालकाला पी.पी.ई. कीट उपलब्ध करून दिले व त्वरित रुग्णवाहिका पाठवून सदर चा मृतदेह कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी करिता पोहोचविला या सामाजिक कार्याची कोडोली ग्रामपंचायत यांनी दखल घेऊन विशेष अभिनंदन केले.
वारणेचा वाघ फौंडेशन’ने जपली सामाजिक बांधिलकी
197