कोल्हापूर

साखर कारखाना कार्यस्थळावर 100 खाटांचे अद्यावत कोव्हिड काळजी केंद्र सुरु करा-जिल्हाधिकारी

by संपादक

साखर कारखाना कार्यस्थळावर 100 खाटांचे अद्यावत कोव्हिड काळजी केंद्र सुरु करा-जिल्हाधिकारी दौलत देसाई
– कोल्हापूर (प्रतिनिधी)आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून १०० खाटांचे अद्यावत ऑक्सीजनेटेड कोव्हिड काळजी केंद्र सुरु करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसिलदारांना केली आहे.
-जिल्ह्यातील कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी दिनांक ९ ऑगस्ट च्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून १०० खाटांचे अद्यावत ऑक्सीजनेटेड कोव्हिड काळजी केंद्र सुरु करण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत. ही केंद्रे पुढील कालावधीत कारखानास्थळावर येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांसाठी सुध्दा वापरता येतील त्या दृष्टीने आता पासून अशी केंद्रे तातडीने अस्थापित करावीत व केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित कारखान्यांकडून केले जावे.
– तहसिलदारांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या साखर कारखाना प्रशासनाशी संपर्क करुन कारखाना कार्यस्थळावर किमान १०० खाटांचे ऑक्सीजनेटेड सुविधेसह अद्यावत कोव्हिड काळजी केंद्र तयार करण्यात यावे. कोव्हिड काळजी केंद्राच्या ठिकाणी कारखाना प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी तहसिलदारांनी पत्र व्यवहार करावा. ज्या कारखाना स्थळावर कारखान्यांची स्वत:ची जागा उपलबध नसल्यास तहसिलदारांनी आपल्यास्तरावरुन आवश्यक इतकी जागा (हॉल/सभागृह) उपलब्ध करुन देण्यात यावे. कोव्हिड काळजी केंद्र तात्काळ उभे करुन तालुक्यातील कोव्हिड -19 रुग्णांना लाभ दिला जाईल, या विषयी आपल्यास्तरावरुन खातर जमा करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

You may also like

Leave a Comment